मोठे स्वप्न पहा आणि ध्येयाकडे वाटचाल करा – राजन शाह

– 8 जुन रोजी दुसरी कार्यशाळा

नागपूर :- महानगरपालिका आणि मनपा कंत्राटदार वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये “लॉ ऑफ अट्रॅक्शन” संदर्भात क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते मुंबई येथील राजन शाह यांनी नागरिकांना मोठे स्वप्न कसे बघावे आणि ते पुर्ण करण्याकरीता कसे सकारात्मक रहायचे, या बद्ल माहिती दिली. त्यांनी नैराश्यातुन बाहेर येऊन चांगले जीवन कसे जगायचे या बद्दल सुद्धा माहिती दिली. त्यांनी सांगितले कि सकारात्मक विचार करून मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे.

या क्षमता बांधणी कार्यशाळेमध्ये आकर्षण आणि प्रकटीकरणाचा नियम, सकारात्मक पुष्टीकरण, निसर्गाचे नियम, कृतज्ञता ही माझी वृत्ती आहे, क्षमा, व्हिज्युअलायझेशन सकारात्मकता आणि इतर फायदे कसे मिळवायचे याबाबत सुद्धा राजन शाह यांनी मार्गदर्शन केले. तसेच विजय नायडू यांनी मॅजिक बुक बद्दल माहिती नागरिकांना दिली. मॅजिक बुकच्या माध्यमाने नागरिकांच्या जीवनात आलेल्या बदल बद्दल त्यांनी या प्रसंगी नागरिकांना सांगितले.

या प्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड उपायुक्त प्रकाश वराडे, सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, नरेंद्र बावनकर, श्याम कापसे, प्रमोद वानखेडे उपस्थित होत. कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांनी केले. या कार्यशाळेचे दुसरे भाग शनिवारी ८ जुन रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सकाळी. ९.३० वाजता होणार आहे. नागरिकांना मोठ्या संख्येत कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन मनपा उपायुक्त प्रकाश वराडे आणि विजय नायडू यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आयुक्तांनी केली नाईक तलावाच्या कामाची पाहणी

Thu Jun 6 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे लालगंज बांगलादेश येथील नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू असून या कामाची बुधवारी (ता.५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. तलावाच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या पाहणी दौ-यात मुख्य अभियंता राजीव गायकवाड, सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता अजय गेडाम, सार्वजनिक आरोग्य अभियंता संदीप लोखंडे आदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com