डॉ. रमाकांत पांडा यांचे छायाचित्रणाबरोबरचवन संवर्धनाचे कार्य महत्वपूर्ण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- निसर्ग विविधतेने नटलेला आहे. या निसर्गातील वन्य प्राण्यांचे डॉ. रमाकांत पांडा यांनी केलेले छायाचित्रण कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. या बरोबरच त्यांनी सुरू केलेले वन संवर्धानाचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्रसिध्द हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांनी भारतातील पेंच, जिम कॉर्बेट, सातपुडा, ताडोबा, बांधवगड या व्याघ्र प्रकल्पांसह केनिया, दक्षिण आफ्रिका, टांझानियाचा प्रवास करून सिंह, वाघ, हत्ती, बिबट्यासह वन्य प्राण्यांच्या काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दुपारी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, डॉ . रमाकांत पांडा, एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीनाथ के. ए. आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. पांडा हे देशातील प्रथितयश हृदय शस्त्रक्रिया तज्ञ आहेत. त्यांनी निसर्ग, वन्य प्राणी, पशु पक्षी यांचे केलेले छायाचित्रण सुंदर आहे. त्यांनी निसर्गाचे छायाचित्रण करण्याबरोबर संवर्धनाचे काम केले आहे. ते अनुकरणीय आहे. यावेळी डॉ. पांडा यांनी प्रदर्शनाची माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घराचे स्वप्न साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त  -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sun Nov 26 , 2023
मुंबई :- आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने बांद्रा- कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com