पोरवाल महाविद्यालयात डॉ. विनय चव्हान यांची प्राचार्य पदी नियुक्ती
कामठी ता प्र 7 :- कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात डॉ. विनय चव्हान यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाली. पूर्व प्राचार्य डॉ. महेंद्र बागडे हे 31मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले असून संगणक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विनय चव्हान यांची दिनांक 1 जून पासून कार्यकारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ कामठीचे अध्यक्ष श्री सुनीलकुमारजी पोरवाल, सचिव श्री विजय कुमारजी शर्मा, विकास निर्देशक श्री अशोक कुमारजी भाटिया, सी. ई. ओ. डॉ. एम.एन. घोषाल, पूर्व प्राचार्य डॉ. महेन्द्र बागडे, डॉ. सुधाकर धोंडगे, उपप्राचार्य डॉ. रेणू तिवारी, रजिस्ट्रार श्री स्वप्निल राठोड यांच्यासह महाविद्यालयाच्या समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नवनियुक्त प्राचार्य डॉ. विनय चव्हान यांना शुभेच्छा दिल्या.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)