मुंबई – बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत!
कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांवर घरीच बसून शिक्षण घेण्याची वेळ आली. ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असतानाही विद्यार्थ्यांनी जिद्द न हारता अभ्यास करून मिळविलेले यश अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
बारावीच्या निकालावर विद्यार्थ्यांचे कारकीर्द ठरत असते. त्यामुळे आजच्या घडीला बारावी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आज बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन स्वतःची नवीन वाटचालीकडे पाऊल टाकणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे भावी जीवन प्रगतीच्या प्रकाशाने उजळून जावो अशी शुभेच्छा त्यांनी दिली.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये!
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनीही निराश न होता कठोर मेहनत घेत रहावी. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असा विश्वासही डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
यंदा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता,खचून न जाता नव्या जोमाने मेहनत करून यश संपादित करावे असे राऊत यांनी म्हटले.