नागपूर, दि.27 : डॉ. पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. शासकीय निवासस्थान रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, भावना गवळी, आमदार कृष्णा खोपडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीसुध्दा भाऊसाहेबांना अभिवादन केले.
डॉ. पंजाबराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com