डॉ. पंजाबराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

नागपूर, दि.27 : डॉ. पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. शासकीय निवासस्थान रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, भावना गवळी, आमदार कृष्णा खोपडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीसुध्दा भाऊसाहेबांना अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे धडक कारवाई

Tue Dec 27 , 2022
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.26) 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग न.12 कमला नगर येथील गौरव भेंडे (बिल्डर्स) यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच धंतोली झोन अंतर्गत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com