अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शिष्टमंडळाला आश्वासन

नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू, असे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी कृती समिती शिष्टमंडळाला दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, अंबाझरी, बचाव कृती समितीच्या सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी व समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांच्या नेतृत्वात विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात नमूद केल्यानुसार नागपुरातील अंबाझरी तलावाशेजारील शासकीय ४४ एकर जागेत उद्यान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह ५७ वर्षांपासून अस्तित्वात होते. मात्र सध्या ही जागा खाजगी कंपनीला ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली असून, या कंपनीने जुलै २०२१ मध्ये कोणालाही कल्पना न देता येथील आंबेडकर भवन हटविले. कंत्राटदाराच्या ताब्यातून ही जागा सोडविण्यासाठी या बचाव कृती समितीने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय समजून घेतला व सकारात्मक प्रतिसाद दिला व योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी समितीचे पदाधिकारी डॉ. धनराज डहाट, डॉ. सरोज आगलावे, सुधीर वासे, बाळू घरडे, वर्षा शामकुडे, सिद्धार्थ उके, राहुल परुळकर, रामभाऊ आंबूलकर, प्रताप गोस्वामी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज  - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Thu Dec 22 , 2022
‘‘मोहजाल’’ नाटिकेतून नशामुक्त भारताचा संदेश नागपूर : युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. हीच युवा पिढी आज व्यसनाधीन होत असतांना दिसत आहे. युवापिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढून नशामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्गदर्शनात राधिका क्रीएशन नागपूर प्रस्तुत ‘‘मोहजाल’’ या नाटिकेचा 25 वा प्रयोग आज 21 डिसेंबर रोजी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com