उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वैद्य दत्तात्रय सराफ यांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान

भाजपा वैद्यकीय आघाडी नागपूर महानगरचे आयोजन 

नागपूर :-  भाजप वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरद्वारे धन्वंतरी जयंतीचे मंगल औचित्य साधून नागपुरातील सुप्रसिद्ध आयुर्वेद पंचकर्मतज्ञ वैद्य दत्तात्रयजी सराफ यांचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते वैद्यकीय क्षेत्रातील सेवाकार्याबद्दल “धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या पुरस्कारात सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि शाल, श्रीफळ असं पुरस्काराचे स्वरूप असून तसेच वैद्यकीय आघाडी द्वारे यावर्षीचे युवा आरोग्यरत्न पुरस्कार क्रमश: नागपुरातील युवा न्युरोसर्जन डॉ. क्षितिज गुल्हाने, नर्सिंग ऑफिसर डॉ. अंकुश खोरगडे यांना प्रदान करण्यात आले. सर्वप्रथम भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेला माल्यर्पण करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कारमूर्ती डॉक्टर्स चे अभिनंदन केले व पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांचे असून भाजपा वैद्यकीय आघाडी शहर अध्यक्ष डॉ गिरीश चरडे,महामंत्री डॉ. श्रीरंग वराडपांडे, डॉ. अजय सारंगपुरे, डॉ. तुषार पांडेल, आदी पदाधिकारी डॉक्टर्स उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ६४७ मेट्रिक टन नियतन मंजूर

Wed Oct 26 , 2022
मुंबई :- मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी डिसेंबर २०२२ करिता १८५१२ लाभार्थ्यांकरिता २७७ मेट्रीक टन गहू, ३७० मेट्रीक टन तांदूळ असे एकूण ६४७ मेट्रिक टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरीपुरवठा यांनी दिली आहे. मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात डिसेंबरसाठी परिमंडळ अ,ड,ई,ग,फ मध्ये अत्योंदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com