नागपुर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2024 डॉ.बेनिराम कोचे,यांना पुणे येथिल शरदचंद्र पवार सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. बेनिराम कोचे, संचालक, जीवक योग उपचार व प्रशिक्षण संस्था, नागपूर तसेच आंतरराष्ट्रीय शांती संघटना एच. डब्ल्यू.पी.एल. दक्षिण कोरिया चे शांतिदूत व प्रसिद्धी दूत आहेत. डॉ. कोचे अनेक धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक संघटनांशी जुळून कार्य करतात. या समविचारी संघटनांना एकत्रित येऊन कार्य करने गरजेचे आहे असे त्यांचे मत आहे.त्यांच्या संस्थेद्वारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय शांती संघटना एच. डब्ल्यू. पी. एल. दक्षिण कोरिया चे पीस एज्युकेशन विभागाच्या जनरल डायरेक्टर विक्टोरिया मुत्तूम, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, NDMJ चे राज्यसचीव वैभव गिते, महाराष्ट्र राज्याचे प्रशासन अधिकारी पी. एस. काळे, महिला आघाडीचे राज्याध्यक्ष सुनंदा त्रिगुनायत, संघटनेचे राज्य सचिव सत्यजित जानराव, अध्यक्ष संतोष गायकवाड, संघटक नय्युम इनामदार, शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
डॉ आंबेडकर संघटना ही दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्व जिल्हयातून गुणवंत शिक्षकासाठी प्रस्ताव मागवते व त्यातुन योग्य आणि पात्र शिक्षकांची निवड करते. नोकरी व्यतिरिक्त सामाजिक विकासासाठी योगदान देणाऱ्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना हा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे प्रकाश गोडवे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, सोमनाथ शिंदे, यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शरद पवार सभागृहात रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात 47 गुणवंतांना सदर पुरस्कार देण्यात आले.
पुरस्काराबद्दल डॉ. बेनिराम कोचे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.