नवी दिल्ली :- भारतातील संविधानाचे शिल्पकार, थोर विधिज्ञ, सामाजिक समतेचे प्रणेते आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उभय महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणाकृती पुतळ्यास राज्याचे माजी मंत्री सुरेश खाडे यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
महाराष्ट्र परिचय केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आज साजरी करण्यात आली. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही बाबासाहेबांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.