अरोली :- मौदा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या, गट ग्रा.प. नरसाळा येथून जवळच असणाऱ्या, पारशिवनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गट ग्रा.पं. बोरी( सिंगारदीप) येथे विश्वरत्न,बोधिसत्व, महामानव, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून, मेणबत्त्या लावून, बाबासाहेबांचे विचार, कार्य व स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रा. पं. सरपंच दिपक इंगोले, उपसरपंच शुभांगी टोहने, सचिव वंदना कोटांगले, संगणक परिचालक चंद्रशेखर नागपुरे, ग्रां. प. कर्माचारी रत्नाकर शास्त्रकार पा. पु. कर्मचारी चंद्रशेखर टोहने ,रोजगार सेवक आशिष इंगोले , माजी रोजगार सेवक योगेश नागपुरे, कंत्राटी पा. पु. कर्मचारी संकेत शास्त्रकार , सौरभ येरणे व गावकरी उपस्थित होते.