डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन (अंबाझरी) परिसरात १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्यंत, स्मारकाची पाय उभारनी करा – नारायण बागडे

नागपूर :- अंबाझरी उद्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण करण्यासाठी आंबेडकरी समाजातील सर्व स्तरातील महिला पुरुष कार्यकर्तांनी नागपूर शहरात मोठ मोठे आंदोलन केले या आंदोलनाची दखल शासनाने घेवून खालील समितीची नेमणूक केली.

तक्रारी बाबत चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांना अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि.१ मार्च २०२३ रोजी विभागीय आयुक्त नागपूर विभाग यांच्या आदेशाने विभागीय स्तरावर मा. उपायुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती नेमण्यात आली त्या मध्ये सदस्य अपर जिल्हाधिकारी, नागपूर प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर प्रभारी अधिकारी नझुल तथा उपजिल्हाधिकारी नागपूर, कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग क्र. नागपूर, सहायक आयुक्त (भुसुधार) विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर. सदस्य सचिव म्हणून होते. या चौकशी समिती पुढे निवेदनकर्ता डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (अंबाझरी) परिसर बचाव कृती समितीचे नेतृत्व करणारे यांनी संचिकामध्ये अथवा निवेदनात कोणतेही २० एकरचे कागदपत्रे सादर केले नाहीत त्यामुळे निवेदनकर्ता यांचे निवेदनात सदर कागदपत्रे सादर केले नसल्यामुळे तथ्य दिसून येत नाही अशा शेरा सदर शासकीय चोकशी समितिने दिला त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यावर शंका व खंत समाजात व्यक्त होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्या जागेवर होते त्याच जागेवर सुंदर असे भवन विकासक किंवा शासनाने त्वरित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पंर्यत पाय उभारणी करावी अशी आंबेडकरी कार्यकर्तांची मागणी आहे. नारायण बागडे राष्ट्रीय अध्यक्ष पत्रपरिषद मध्ये देवेंद्र बागडे, प्रा. रमेश दुपारे, अँड. मिलींद खोब्रागडे, संगिता चंद्रिकापुरे, डॉ. सुधा जनबंधु, सुनिता चांदेकर, राजु पांजरे, प्रकाश कांबळे, प्रविण आवळे, चरनदास गायकवाड, दादाराव पाटील, हंसराज उरकुळे, नरेश खन्ना, रोहन बागडे, वैशाली तभाने, इंजि. अनिल मालके, इंजि. ज्ञानेश्वर गजभिये, विराग वासनिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन

Tue Feb 13 , 2024
नागपूर :- सरकारी सेवेत रुजू झालेल्या तरुणांनी समाज जीवनात बदल घडविण्याचा उद्देश ठेवावा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना केले. केंद्र सरकारच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या देशभरातील १ लाखांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com