नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस व ओबीसी अभ्यासक डॉ ऍड अंजली साळवे विटनकर यांची पक्षाच्या ओबीसी विभागा अंतर्गत विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष (नागपूर विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर यांनी मुंबई येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारीणीच्या बैठकीप्रसंगी डॉ ऍड अंजली साळवे यांना विदर्भ विभागीय कार्याध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र दिले. यावेळी पक्षाच्या ओबीसी विभागाच्या राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात कामाचा अनुभव असलेया डॉ ऍड अंजली साळवे यांचा महिला व बालकल्याण क्षेत्रात तसेच ओबीसी प्रवर्गाचा विशेष अभ्यास असून ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा प्रश्न संसद, विधिमंडळ. व न्यायालयात सतत्याने लावून धरला आहे. याशिवाय ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा विषय ‘पाटी लावा अभियाना’ च्या माध्यमातून त्यांनी घरा घरात पोहचविला आहे. मागिल अनेक वर्षांपासून ओबीसी प्रवर्गाच्या विविध संविधानिक मागण्यांच्या आंदोलनात देखील त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. डॉ ऍड अंजली साळवे यांच्या नियुक्तीचे पक्ष नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून भविष्यातील वाटचालीसाठी सुयश चिंतले आहे.