उदयनिधी स्टॅलिन यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- सनातन धर्माबद्दल बेताल वक्तव्य करून लाखो लोकांच्या भावना दुखावण्याचा उदयनिधी स्टॅलिनला काय अधिकार? त्याच्या द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बिघडू देणार नाही, असे सांगत राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केली आहे.

कॅबिनेट मंत्री लोढा यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त करताना म्हटलं आहे की “या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही! कारण, सनातन संस्कृती ही कोणत्याही प्रकारे प्रभावी औषधासारखी आहे, जी राष्ट्र विरोधी विचारधारेला भारतात वाढू देत नाही! तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्म संपवण्याचे बोलून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मी विनंती करतो की, उदयनिधी स्टॅलिन, जोवर त्याचे विधान मागे घेत नाही, तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात येण्यापासून बंदी घालावी! अशा लोकांना महाराष्ट्रात येऊ देऊन, आम्ही इथले वातावरण बिघडू देणार नाही!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डागा अस्पताल में मची स्वच्छता अभियान की खिल्ली

Wed Sep 6 , 2023
– डागा अस्पताल में डेंगू का प्रकोप – कांग्रेसियों ने किया डागा अस्पताल का मुआयना नागपूर :-दिन पे दिन डेंगू का प्रकोप बहुत तेज़ी से नागपूर शहर में फैल राहा है… ऐसा ही शहर के प्रसिद्ध शासकिया डागा अस्पताल में देखने मिला वह आए मरीजो का हाल बेहाल पाया गया साथ में जा तह गंदगी का आलम नज़र आया कूड़े […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com