पवार साहेबांनी टाकलेल्या जाळ्यात अडकू नका !

आव्हाड यांनी ‘राम हा मांसाहारी होता आणि त्यामुळे तो बहुजन समाजाचा होता’ हे जे विधान केलंय ते शरद पवार  व्यासपीठावर असताना केले आहे . शरदराव हे पट्टीचे राजकारणी आहेत .’ उडणाऱ्या पक्षाची पिसे मोजणारा राजकारणी ‘ अशी त्यांची कीर्ती आहे आणि ती खरी देखील आहे . आव्हाड यांच्या विधानानंतर काय गोंधळ उडेल , कशावरून उडेल आणि तो कोण उडवेल हे त्यांना नक्की माहीत असणारच . तरीही त्यांनी आव्हाड यांना ते विधान करू दिलंय ह्याचा अर्थ साधा नाही .

खाली जो फोटो आहे तो अगदी महिण्याभरापूर्वीचा ! त्यात पवार साहेबच म्हणत आहेत ‘ वातावरण भाजपच्या बाजूने ‘ ! पवार यांना कितीही आणि काहीही म्हणा ‘ परिस्थिती बदलायचा ते शेवटपर्यंत प्रयत्न करतात ‘ हा त्यांचा गुण कोणालाही अमान्य करता येणार नाही .

तेच त्यांनी इथे केलंय!

हे विधान केल्यावर भाजपच्या लोकांनी जो दंगा सुरू केलाय , वेगवेगळे संदर्भ टाकून राम हा शाकाहारीच कसा होता हे सांगायला , त्यावरून राष्ट्रवादीच्या नावाने शिमगा करायला जी सुरुवात केली आहे ती बघता पवार साहेबांनी टाकलेल्या जाळ्यात भाजप अडकली आहे असेच म्हणावे लागेल .

राम शाकाहारी होता का मांसाहारी हा मुद्दाच नाहीये खरेतर ! पण रामाला शाकाहारीच ठरवण्याचा भाजपचा जो अट्टाहास सुरू आहे , रामाला मांसाहारी म्हणून आव्हाड ह्यांनी रामाचा अपमान केला आहे असे भाजपने परत परत सांगणे सुरू आहे ह्यावरून ‘ भाजपला हवा असणारा राम हा ब्राम्हणांचा आहे , बहुजनांचा नाही ‘ हा मेसेज बहुजन समाजापर्यंत पोचवण्यात पवार साहेब यशस्वी झालेत असेच म्हणावे लागेल .

खरेतर राम शाकाहारी होता का मांसाहारी ह्यांच्याशी आम्हला काहीही देणेघेणे नाही , राम हा त्याच्या गुणांमुळे आम्हाला प्रिय आहे , आमच्यासाठी देव आहे , बाकी विषय संपला हा स्टँड भाजपच्या लोकांनी घ्यायला हवा .

राम बहुजन समाजाचा आहे हे भाजपने खरेतर परत परत सांगायला हवे .

बहुजन समाजाचा विश्वास गमावणे किंवा तो कमी करणे हे भाजपच्या दृष्टीने चांगले नाही . राजकारण सोडा पण देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा ते चांगले नाही .

भारतातला बहुसंख्य वर्ग हा मांसाहारी असताना उगीच मांसाहाराच्या नावाने बोटे मोडणे तर अजिबात चांगले नाही . कोणी काय खावे काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . त्यात नीतिमत्ता , संस्कार वगैरेची इंजेक्षने टोचून उगीच दुसऱ्याला ( मांसाहारी समाजाला ) दुखावू नये असे वाटते . ते जड जाऊ शकते हिंदुत्ववाद्यांना ! कोणी काय खावे हे दुसऱ्याने ठरवणे हा फार नाजूक विषय आहे , त्यावरून लोकांच्या भावना नक्की दुखावतात .

‘ भाजप / हिंदुत्व म्हणजे ब्राम्हणांची सत्ता ‘ हे जनतेला परत परत सांगून , त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून काँग्रेसने इतकी वर्षे सत्ता हातात ठेवली होती . तो गैरसमज दूर करण्यासाठीच भाजप / हिंदुत्वाच्या काही पिढ्यांची हयात गेली . तो गैरसमज आता कुठे दूर होतोय . तेव्हा परत हा गैरसमज बहुजन समाजाच्या मनात अजून पक्का करायचे आत्मघातकी काम भाजपने सोशल मीडियावर अजून करू नये . स्वतचा शत्रू बनू नये .

राम हा आदर्श होता म्हणून आम्हाला तो आवडतो , बाकीच्या चर्चेत आम्हाला रस नाही असे सांगून ह्या विषयाकडे ढुंकून दुर्लक्ष करावे जे भाजपच्या हिताचे आहे , हिंदुत्वाच्या हिताचे आहे . कारण हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशकता! त्याच्या विरोधात काहीही भाजपने करू नये .

कळकळीने सांगतोय ! जरा विचार करा ! आव्हाड साहेबांनी पर्यायाने पवार साहेबांनी फेकलेल्या पिंजऱ्यात अडकु नका . त्यांनी हिंदुत्ववाल्यांना कामाला लावले आहे म्हणून ते काम करू नका . प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे हा काही नियम नाही . शांत बसा . तेच भाजपच्या हिताचे आहे .

– डॉ सुबोध नाईक

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रा. दिलीप दिवे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Mon Jan 8 , 2024
नागपूर :-श्री अयोध्या नगरी येथे प्रभू श्री राम चंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असून, या शुभ कार्याचे औचित्य साधून, दक्षिण-पश्चिम मंडळाचे महामंत्री, माजी शिक्षण सभापती व माजी नगरसेवक प्रा. दिलीप दिवे यांनी दिनदर्शिका. या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार  प्रविण दटके, दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष रितेश गावंडे,  किशोर वानखेडे, नितीन महाजन, कल्पना तडस, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com