कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक एक स्थित बस स्थानकामध्ये मागील पाच-सहा वर्षांपूर्वी पासून एसटी महामंडळाच्या बसेस थांबत नसून बस स्थानकासमोरील हंस मेडिकल व देवतळे कॉम्प्लेक्स यांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावरच थांबते. त्यामुळे येथील बस स्थानक शोभेची वस्तू बनली असून, त्याच्या वापर खाजगीरित्या वाढलेला आहे. बस स्थानक हे प्रवाशांना बसण्यासाठी बनवले जात असून, मात्र या बस स्थानकात बस थांबत नसल्याने प्रवासी बसण्याऐवजी रस्ता दुतर्फा उभे राहून बसची वाट पाहतात आणि गावात फिरणारे कुत्रे मात्र येथे रात्र दिवस बसले असतात. त्यामुळे या बस स्थानकाला कुत्रे स्थानकाचे स्वरूप आल्याचे आज सकाळी साडेसात वाजता दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश देवतळे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सध्या एसटी महामंडळाला सुगीची दिवस आले असून महिलांच्या अर्धी तिकीट च्या शासनाच्या घोषणेमुळे खाजगी प्रवासी वाहतूक जवळपास बंद झाली असून बसांमध्ये प्रवाशांची गर्दीच गर्दी दिसून येत आहे. लाडली बहिणींना अर्ध तिकीटाचा लाभ मिळत असल्याने, तोट्यात असणारी एसटी महामंडळ नफ्यात येऊनही, प्रवाशांची संख्या भरमसाठ वाढूनही बसांची संख्या मात्र न वाढल्याने, प्रत्येक बसेस मध्ये गर्दी होत असल्याने विद्यार्थी , सामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच बस स्थानकावर बस थांबण्या ऐवजी रस्त्यावरच बस येताच धावत प्रवास्यांची उतरणे व चढण्याच्या प्रकारामुळे , व सध्या राज्यात व देशात अपघातांच्या मालिकाच सुरू असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता बस स्थानक चौकात त्यांनी वर्तवली असून संबंधित विभागाने येथील बस स्थानकाचे नूतनीकरण करून बस वाहक व चालकांना येथील बस स्थानकात बस थांबविण्याचे निर्देश देऊन भविष्यात होणाऱ्या मोठ्या अपघाताला आळा घालण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.