संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 7 :- बकरी ईद व आषाढी एकादशी च्या निमित्ताने दोन्ही समाजाने आपले धार्मिक कर्तव्य पार पाडून सणोत्सव साजरा करावा मात्र इतर धर्मियांची अवहेलना होणार नाही व त्यात कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत व्यक्त केले.
यावेळी एसीपी नयन आलूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे, पोलीस निरीक्षक राहुल शिरे , नायब तहसीलदार राजीव बमनोटे, स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी सर्व धर्मीय शांतता समितीचे प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष शकुर नागानी, शिवसेना चे पदाधिकारी राजन सिंह, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी इर्शाद कुरेशी यासह काही निवडक प्रतिनिधींनी बकरी ईद निमित्त प्रशासनाला सूचना सादर केल्या.त्यात प्रामुख्याने कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावता कामा नये त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचे आश्वासन संबंधितांनी पोलिस विभागाला दिले.
याप्रसंगी एसीपी नयना आलूरकर यांनी कायदा हा कसा सर्वश्रेष्ठ आहे हे समजून सांगताना त्यांनी विविध उदाहरणे दिले.तेव्हा धार्मिक कर्तव्य पार पाडा मात्र इतर धर्मियांची अवहेलना करू नका असे आव्हान सुद्धा करण्यात आले.
बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी सादर करताना बकरी ईद व आषाढी एकादशी पर्वा निमित्त पोलीस विभागाला नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत हे विशद केले.तर आभार गुप्त विभागाचे अखिलेश ठाकूर यांनी मानले.
धार्मिक कर्तव्य अवश्य पार पाडा पण इतर धर्मीयांची अवहेलना करू नका-डीसीपी सारंग आव्हाड
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com