मुंबई :- देशभक्ती आणि शिस्त यांचे प्रतीक असलेल्या सी कॅडेट कोअरच्या युवा कॅडेट्सच्या ५० जणांच्या एका चमूने शनिवारी (दि. १२) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी सी कॅडेट कोअरच्या कार्याची माहिती करून घेतली व कॅडेट्सना कौतुकाची थाप दिली. सुरुवातीला सी कॅडेट कोअरचा स्थापनेपासूनच इतिहास सांगणारा माहितीपट दाखविण्यात आला.
यावेळी नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, सी कॅडेट कोअरचे भीष्म पितामह कमोडोर (एससीसी) रबी आहुजा तसेच सी कॅडेट कोअरचे अधिकारी उपस्थित होते.