माझे फोटो वापरू नका, शरद पवार यांची सक्त ताकीद

नागपूर  :- राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे फोटो सर्रासपणे वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शरद पवार चांगलेच संतापले आहेत. फोटो वापरणाऱ्यांना शरद पवार यांनी चांगलीच ताकीद दिली आहे. माझे फोटो वापरू नका. नाही तर कोर्टात जाईन, असा इशाराच शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे अजित पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. शरद पवार यांनी तंबी दिल्यानंतर अजित पवार गट काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अपेक्षेनुसार अजितदादा गटाने प्रतिक्रियाही दिली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या मुद्द्यावर अजितदादा गटाची भूमिका स्पष्ट केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांच्या फोटोबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, शरद पवार हे आमचे गुरू आहेत. गुरुचे फोटो छापणारच. कायदेशीर कारवाई करतील तेव्हा बघू कोर्टाकडून काय निर्देश येतात ते. पण ते आमचे गुरू आहेत. त्यांचा फोटो लावणारच, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी ठणकावून सांगितलं. शरद पवार यांचे आशीर्वाद राहिले पाहिजे. सध्या त्यांचे आशीर्वाद आहेत. ते एनडीएत येणार की नाही सांगू शकत नाही. त्याबाबत नेते निर्णय घेतील, असं आत्राम यांनी सांगितलं.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कारगिल विजयाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मृती प्रित्यर्थ बॅटल ऑफ माईंड अर्थात मनाचे द्वंद्व या भारतीय सेना प्रश्नमंजुषा 2023 स्पर्धेचे उद्घाटन

Thu Aug 17 , 2023
नवी दिल्‍ली :- ज्ञानवर्धन आणि युवावर्गाच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय लष्कराने आज दिल्ली लष्करी छावणी क्षेत्रातील माणेकशॉ केंद्रामध्ये ‘बॅटल ऑफ माइंड्स’ – इंडियन आर्मी क्विझ 2023, अर्थात ‘मनाचे द्वंद्व’-भारतीय सेना प्रश्नमंजुषा स्पर्धा 2023 चे, आकर्षक बोधचिन्हासह अनावरण केले. कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्षाच्या अर्थात रौप्य महोत्सवाची सुरुवात करणारी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा, कारगिल युद्धातील भारतीय सशस्त्र दलांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com