गरिबांना उपचारासाठी ‘वेटिंग लिस्ट’मध्ये ठेवू नका ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एम्सच्या अधिकाऱ्यांना सूचना

नागपूर :- विदर्भासह आसपासच्या प्रदेशातील गरीब रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून आपण नागपूरमध्ये एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आणले आहे. त्यामुळे कुठलाही गरीब रुग्ण उपचारासाठी वेटिंग लिस्टमध्ये राहणार नाही, याची पूर्ण काळजी घ्या, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) एम्सच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

ना. नितीन गडकरी यांनी एम्स येथील कामाचा आणि यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यावेळी एम्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संचालक डॉ. प्रशांत जोशी व डॉक्टरांची उपस्थिती होती. ‘कोणत्या उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियांसाठी तसेच तपासण्यांसाठी वेटिंग लिस्ट आहे आणि ‘वेटिंग लिस्ट’चे कारण काय आहे, याचा शोध घ्या. अशी परिस्थिती एम्ससारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कधीच उद्भवणार नाही, याची विशेष काळजी घ्या. गरिबांना उपचारासाठी वाट बघायला लावू नका. गरज पडल्यास नागपुरातील ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा घेता येईल का, हे तपासून बघा,’ अशी सूचना ना. गडकरी यांनी दिल्या. यासोबतच एम्समधील परिचारिकांची संख्या वाढवून कामाचा ताण कमी करता येईल, असेही ना. गडकरी म्हणाले.

मुबलक औषध साठा आहे की नाही, तपासण्या करणारी यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, याचीही पूर्ण काळजी घ्या. एम्समधील पूर्ण व्यवस्थेचा लाभ गरिबांना होईल यादृष्टीने काम करावे, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी ना. गडकरी यांच्या हस्ते बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट युनिट, सिकल सेल युनिट, न्युक्लियर मेडिसिन आणि आय बँक या विभागांचेही उद्घाटन झाले.

सिकलसेलच्या रुग्णांचा उपचार झालाच पाहिजे

ज्या भागात आपण एम्स उभे केले आहे, तेथील सर्वांत मोठी समस्या सिकलसेल आणि थॅलेसिमियाची आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे एम्समध्ये त्यांचा उपचार झालाच पाहिजे, असा आग्रह ना. गडकरी यांनी व्यक्त केला. ज्यांना गरज आहे अशा जास्तीत जास्त रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट एम्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे, असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्कूली छात्रों को शैक्षणिक साहित्य वितरित

Sun Aug 4 , 2024
नागपुर :- अखिल भारतीय पुलक मंच परिवार महावीर वार्ड नागपुर, अमरस्वरुप फाउंडेशन द्वारा भारत गौरव राष्ट्रसंत आचार्यश्री पुलकसागर गुरुदेव के प्रेरणा और आशीर्वाद से स्कूली छात्रों शैक्षणिक साहित्य वितरित किया गया। शनिवार की सुबह छत्रपति माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय में हुए कार्यक्रम की अध्यक्षता सुरेश गावंडे ने की। राष्ट्रीय शिवाजी मंडल के सदस्य भोंडगे, पुलक मंच परिवार के राष्ट्रीय अध्यक्ष मनोज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!