नागपूर : महा मेट्रो नागपूरच्या प्रवासी सेवा सकाळी ६.३० ते रात्री १० वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी उपलब्ध आहे. ऑरेंज लाईन मार्गावर खापरी,न्यू एयरपोर्ट, एयरपोर्ट, साउथ एयरपोर्ट,एयरपोर्ट, उज्जवल नगर,जय प्रकाश नगर, छत्रपति चौक,अजनी चौक, रहाटे कॉलोनी, कांग्रेस नगर, सिताबर्डी इंटरचेंज, झिरो माईल फ्रिडम पार्क,कस्तुरचंद पार्क, गड्डीगोदाम,कडबी चौक, नारी रोड आणि आटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन तसेच ऍक्वा लाइन मार्गावर, प्रजपती नगर, वैष्णो देवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक,चितार ओली, अग्रसेन चौक,दोसर वैश्य चौक, नागपूर रेल्वे स्टेशन,सिताबर्डी इंटरचेंज,झांसी रानी चौक, इंस्टिट्यूट ऑफ इंजीनियर्स, शंकर नगर चौक, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज, सुभाष नगर, रचना रिंग रोड जंक्शन, वासुदेव नगर, बंसी नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे !
महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत ऑरेंज लाईन मेट्रो स्टेशन आणि पुढे मिहान डेपो पर्यंत तसेच ऍक्वा लाईन मार्गावर सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर आणि पुढे हिंगणा डेपो पर्यंत मेट्रो ट्रेनचे संचालन सुरु असते. मेट्रो ट्रेनचे संचालन २५००० वोल्ट विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होतो. ट्रेनच्या संचालनाकरिता विद्युत प्रवाह होतो व पतंग किवा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्यास यामुळे दुर्घटना घडू शकते.
सर्व नागरिकांना याकरिता या निवेदनाच्या माध्यामाने सावधान करण्यात येते कि, मेट्रो रेल मार्गाच्या जवळ पतंग उडवू नये. यामुळे दुर्घटना टाळता येते आणि तसेच पतंग व मांजा अडकल्याने मेट्रो सेवा प्रभावित होणार नाही.