काहीही करा, मी पुन्हा येईन, म्हणा आणि विविध मराठी वाहिन्यांचा आगाऊपणा

घडलेला किस्सा सांगतो, आमच्या एका ओळखीच्या पन्नाशीतल्या बाई त्यांच्या पोटात अचानक मासाचा गोळा वाढला आणि गावकरयांनी हूल उठवली कि बाईंना दिवस गेले,शस्त्रक्रिया करून पोटातली ती मोठी झालेली गाठ काढेपर्यंत, बाईंच्या डोहाळ्यांपासून तर मुलगा होईल कि मुलगी, बाळंतपण सासरी करतील कि माहेरी, बाळंतपणाची तारीख, एवढे त्यावर गॉसिप्स कि त्या बाई शारीरिक वेदना दूर पण त्यांचे अख्खे कुटुंब एवढ्या मानसिक तणावाखाली कि शेवटी त्यांच्या तरण्या मुलीला मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार करवून घ्यावे लागले, यापद्धतीचा उतावीळपणा जेव्हा एकाचवेळी राज्यातल्या बातम्या देणार्या अख्ख्या मराठी वाहिन्या, मी पुन्हा घेईन या ट्विटवर दिवसभर धुडगूस घालतात, नको त्या बातम्या रंगवून त्यावर चर्चा घडवून आणून स्वतःचे मोठे हसे करवून घेतात तेव्हा या मीडिया क्षेत्रात विशेषतः वाहिन्यांमध्ये कशी उतावीळ अर्धवट अडाणी बेवकूफ मूर्ख मंडळींची मोठ्या प्रमाणावर खोगीर भरती करण्यात आलेली आहे, त्याची प्रचिती येते. विशेषतः भाजपा नेत्यांना वेठीस धरून आणि सुषमा अंधारे अतुल लोंढे नाना पटोले पासून तर अगदी मॅच्युअर्ड पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत पद्धतीच्या भाजपच्या बहुसंख्य बावळट विरोधकांना हाताशी पकडून वाहिन्यांनी अजागळ असा धुसगूस दिवसभर घालून उरली सुरली विश्वासहर्ता गमावून बसण्याची साऱ्याच वाहिन्यांनी मोठी किमया करवून दाखवली….

महाराष्ट्रातल्या साऱ्याच राजकीय पक्षात अंतर्गत विचारविनिमय करण्यासाठी किंवा एकंदर राजकीय हालचाली टिपणारी सोशल मीडिया जशी कार्यरत असते ती तशी भाजपामध्ये तर कल्पनेपलीकडे ऍक्टिव्ह आहे असते, पक्ष बळकटीसाठी किंवा प्रचार प्रसारासाठी या अशा सोशल मीडियाचा भाजपा मोठा उपयोग करून घेतो, विशेष म्हणजे अनेक नवशिके होतकरू उत्साही तरुण कार्यकर्त्यांना मोठ्या खुबीने हाताशी धरून भाजपा वर्तुळातल्या एक धूर्त बाई त्यातून स्वतःच्या प्रसिद्धीचा आणि आर्थिक बळकटीचा फार मोठा गैरफायदा गेली अनेक वर्षे करवून घेत आलेल्या आहेत, योग्य वेळी मी त्या लबाड देखण्या बाईचे नेमके हिडीस स्वरूप उघड करायला नक्की मागे पुढे बघणार नाही पण त्या आधीच जर भाजपा श्रेठींच्या जर त्यांची नेमकी ढवळाढवळ कशासाठी हे लक्षात आले तर तेच तिला तिची जागा दाखवून मोकळे होतील. नेमका विषय आहे, मी पुन्हा येईन, या ट्विटचा, जो चुकून भाजपा वर्तुळाबाहेर लीक झाला आणि नको तेवढा मनःस्ताप विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनाकारण सहन करावा लागला आणि वाहिन्यांनी ट्विटवर स्वतःच्या अकला पाजळत एवढा प्रचंड गोंधळ घातला कि शेवटी भाजपा श्रेष्ठीना त्या ट्विटवर सावरासावर करावी लागली, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच असतील असे त्यांना बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगावे लागले….

स्वतःचे अंदाज बांधत आणि अलीकडे घडलेल्या राजकीय पार्शवभूमीचा आधार घेत विविध मराठी बातम्या देणार्या वाहिन्यांनी विशेषतः सत्ताधारी मंडळींच्या गोटात दिवसभर अस्वस्थता पसरविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न केला त्यातून किंवा सततच्या या अशा बातम्यातून करोना नंतर तशीही वर्तमानपत्रांची खपाच्या बाबतीत जशी अतिशय केविलवाणी अवस्था झालेली आहे तेच या वाहिन्यांचे देखील नक्की होणार आहे, केवळ नेमक्या राजकीय हालचाली टिपण्यासाठी दर्शक या वाहिन्या बघून लगेच संच बंद करून मोकळे होतील. फडणवीस आणि शिंदे अलीकडे दिल्लीला विविध कामांच्या मंजुरी संदर्भात आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते पण त्या भेटीचा देखील चुकीचा संदर्भ जोडून आणि पात्र अपात्रतेचा पेंडिंग विषय चघळून वरून विरोधकांना हाताशी घेत या वाहिन्यांनी भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर असलेला राग व द्वेष याची त्यांनी जणू 27 तारखेला उट्टे काढले आणि स्वतःचेच मोठे हसे करवून घेतले. काहींचा तर या निमित्ताने अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा छुपा अजेंडा त्यातून दिसून आला आणि या संदर्भात मी याआधीच तुम्हाला सांगून मोकळा झालो आहे कि शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या भुजबळ यांच्या सारख्या समस्त मंत्र्यांनी अभूतपूर्व आर्थिक धुडगूस पुन्हा घातल्याने, भाजपा श्रेष्ठी मागे फिरले आणि पुन्हा एकवार त्यांना देवेंद्र फडणवीसांचे महत्व लक्षात आल्याने, अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या निर्णयातून त्यांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे स्थान अधिक बळकट नक्की झालेले आहे. वाहिन्यांनी फार आगाऊपणा करण्याच्या भानगडीत पडू नये….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sat Oct 28 , 2023
– प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण  मुंबई :- केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!