‘सोबत’च्या बहिणींसाठी दिपावली स्नेहमिलन रविवारी

– श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे आयोजन : सेवाभावी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन

नागपूर :- २०१९-२० या वर्षी उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेक भगिनींचे संसार उघड्यावर पडले, अनेक मुलांच्या डोक्यावरील छत्र हरपले. अशा संकटसमयी पुढे येऊन श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारे संचालित ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पाने २७३ भगिनींची त्यांच्या मुलाबाळांसह जबाबदारी स्वीकारली. या सर्व भगिनींकरिता दिवाळीनिमित्त दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. सुरेंद्रनगर आरपीटीएस रोड येथील जेरिल लॉनमध्ये सायंकाळी ५ वाजता दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजीत आणि दैनिक नवभारतचे संपादक संजय तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे.

कोरोना महामारीमध्ये अनेक भगिनींना वैधव्य प्राप्त झाले. अशा २७३ परिवारांचे पालकत्व श्री. सिध्दिविनायक सेवा ट्रस्ट द्वारा संचालित ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात आले आहे. दरवर्षी अशा बहिणींना दिपावली स्नेहमिलन म्हणून त्या महिन्याचे रेशन, दिवाळीचे गोड-धोड, फराळ, त्यांच्या मुलांकरिता फटाके, बहिणींना साडी देऊन एकत्रित भोजनाचा आनंद घेतला जातो. यावर्षी देखील ‘सोबत’ परिवारातील २७३ बहिणींसोबत दिपावली मिलन कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील संदीप जोशी यांनी केले आहे.

दिपावली मिलन कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता ‘सोबत’ प्रकल्पाचे ज्योत्स्ना कुहेकर, आनंद टोळ, प्रकाश रथकंठीवार, प्रणय मोहबंशी, प्रिती आखरे, स्मिता दिक्षीत सहकार्य करीत आहेत.

एका बहिणीच्या दिवाळी भेटीची जबाबदारी घ्या

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या २७३ भगिनींचा संसार सावरण्याची जबाबदारी ‘सोबत’ पालकत्व प्रकल्पाने घेतली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या सर्व परिवारातील मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. रविवारी २० ऑक्टोबर रोजी दिपावली मिलन कार्यक्रमामध्ये बहिणींना साडी, मुलांना फटाके, गोडधोड, फराळ आणि महिनाभराचे रेशन देऊन भाऊबीज दिली जाणार आहे. दिवाळीची एका बहिणीची भेट ही एकूण २१०० रुपयांची आहे. यासाठी समाजातील दानशूर आणि सेवाभावी नागरिकांनी पुढे आल्यास ‘सोबत’च्या कार्याला मोठी साथ मिळेल, असे आवाहन श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे. दानशूर व्यक्तींना आयडीबीआय बॅंकेच्या लक्ष्मीनगर शाखेतील श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट ‘सोबत’, खाते क्रमांक – 0663104000114363 (IFSC : IBKL0000663) या बँक खात्यामध्ये सहकार्य राशी जमा करता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाढत्या ऑनलाईन घोटाळ्यांन तोंड देण्यासाठी केंद्र सरकार आणि मेटा यांचे “स्कॅम से बचो” म्हणजेच “घोटाळ्यांपासून सावध राहा” अभियानाद्वारे एकत्रित प्रयत्न

Fri Oct 18 , 2024
– डिजिटल सुरक्षितता आणि दक्षता यांची संस्कृती जोपासण्यासाठी स्वीकारलेला हा संपूर्णतः सरकार दृष्टीकोन आहे : केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू – आम्ही अधिक निर्धोक, अधिक सुरक्षित आणि लवचिक डिजिटल भारताची संकल्पना साकार करणारी चळवळ उभारत आहोत: संजय जाजू नवी दिल्ली :- येथे आज “स्कॅम से बचो” म्हणजेच “घोटाळ्यांपासून सावध राहा” या राष्ट्रीय जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय माहिती आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com