आदर्श आचार संहितेमुळे ८ एप्रिलचा विभागीय लोकशाही दिन रद्द

नागपूर :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीर आदर्श आचार संहिता लागू असल्याने ८ एप्रिल २०२४ रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.

शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिन घेण्यात येतो. मात्र, आदर्श आचार संहितेमुळे या महिन्यात सोमवार ८ एप्रिल रोजी प्रस्तावित असणारा विभागीय लोकशाही दिन घेतला जाणार नाही असे कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेघरांचा शोध घेउन त्यांना निवारा केंद्रात आश्रय

Sat Apr 6 , 2024
– उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोनांतर्गत समाजविकास विभाग सज्ज नागपूर :- नागपूर शहरातील वाढते तापमान लक्षात घेता बेघर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे बेघरांचा शोध घेउन त्यांना निवारा केंद्रात आश्रय दिला जात आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शानानुसार, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com