नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीर आदर्श आचार संहिता लागू असल्याने ८ एप्रिल २०२४ रोजीचा विभागीय लोकशाही दिन होणार नसल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.
शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेत विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिन घेण्यात येतो. मात्र, आदर्श आचार संहितेमुळे या महिन्यात सोमवार ८ एप्रिल रोजी प्रस्तावित असणारा विभागीय लोकशाही दिन घेतला जाणार नाही असे कळविण्यात आले आहे.