भंडारा : सामान्य नागरिकांच्या प्रवासाचे हक्काचे साधन म्हणजे राज्यपरिवहन महामंडळाच्या बसेस (एस.टी) अशा या महामंडळाच्या संपामुळे तसेच कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन प्रश्नांमुळे एस.टी च्या फेऱ्या बंद होत्या.
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी दिनांक 28 ऑक्टोबर 2021 पासून संप, दुखवटा मध्ये सामील असून त्यातील काही निवडक चालक, वाहक दैनंदिन कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे निवडक चालक, वाहकांद्वारे भंडारा आगारातून भंडारा ते नागपूर मार्गावर 12 फेऱ्या, भंडारा ते पवनी मार्गावर 5 फेऱ्या, साकोली आगारातून साकोली ते नागपूर 2 फेऱ्या, साकोली ते भंडारा 3 फेऱ्या व तुमसर या आगारातुन तुमसर ते भंडारा 3 फेऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, भंडारा विभागाने सुरू केलेल्या आहेत.
भंडारा विभागातील आगारांमधुन जिल्हा मार्गांवर निवडक फेऱ्या सुरू असून चालक, वाहक आपल्या कामावर जसे जसे हजर होतील त्यानुसार आगारातील वाहतुक पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात येईल. तरी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या रा.प. बसेस मधुन प्रवास करावा असे आवाहन विभाग नियंत्रक भंडारा यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.