– विविध स्पर्धेतील 125 पैकी 36 स्पर्धेक विजयी
नागपूर :- पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या करण्यात आले. यावेळी 15 ते 29 वयोगटातील 125 स्पर्धकांनी विविध स्पर्धेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये 36 स्पर्धेकांनी विजय मिळविला. समारोपीय कार्यक्रमात विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी विजयी स्पर्धेकांना बक्षिस देवून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
युवा महोत्सवात पोस्टर स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, रांगोळी, कथा लेखन, लोकनृत्य, लोकगित (एकल व दुहेरी) महाराष्ट्र राज्यासाठी असलेल्या वक्तृत्व स्पर्धेत तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
महोत्सवाच्या यशस्वीतेकरीता नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटरचे प्राचार्य रविंद्र हरिदास यांचे सहकार्य लाभले. या महोत्सवास जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी माया दुबळे, राजेंद्र साप्ते, तज्ज्ञ परिक्षक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.