चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेटची निवड चाचणी २०२३

चंद्रपूर :- विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या पत्रानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनिअर ( मुले व मुली ) खेळाडूंना कळविण्यात येते कि, १४वी सब ज्युनिअर, १८वी ज्युनिअर व २३वी सिनिअर ( मुले व मुली ) टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन ०८ ते १० सप्टेंबर २०२३ दरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा व सिटीचा संघ सहभाग करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा व सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याची निवड चाचणी दिनांक २० ऑगस्ट २०२३ राजी सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात येत आहे.

चंद्रपूर जिल्हा सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अनिस अहमद खान, उपाध्यक्ष डॉ. महेशचंद शर्मा व सचिव प्रा. विक्की तुळशीराम पेटकर यांच्या उपस्थितीत निवड समितीद्वारा निवड चाचणी घेण्यात येणार आहे. सदर निवड चाचणीत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना सोबत येताना आधार कार्डची ०३ प्रत झेरॉक्स व ०३ पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे. उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या मुले व मुली खेळाडूंचे चंद्रपूर जिल्हा व सिटी टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, चंद्रपूरच्या संघात निवड केली जाईल व निवड झालेला संघ नागपूर येथे दिनांक ०८ ते १० सप्टेंबर २०२३ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे प्राधिनीतीत्व करणार.

तरी इच्छूक खेळाडूंनी सुरज परसूटकर (8669075173), विश्वास इटनकर (9284537514), बंडू डोहे (7066666105), नरेंद्र चंदेल (7769034966), हर्षल क्षिरसागर (706691570), मनोज डे (9604320915), इखलाख पठान (9834307243), निखिल पोटदुखे (8605774467), राकेश ठावरी (8551976156), मिलिंद चौधरी (8888330533), प्रा. पूर्वा खेरकर (9552486804), रुचिता आंबेकर (8552925066) यांच्याशी संपर्क साधावा.

निवड चाचणीचे नियम

०१) U-17 वर्षांसाठी 01 / 01 / 2010 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

०२) U-19 वर्षांसाठी 01 / 01 / 2007 किंवा त्या नंतरचा जन्म असावा.

०३) खेळाडूने आधार कार्डची 03 प्रत झेरॉक्स व 03 पासपोर्ट फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिउत्कृष्ट सेवा पुरस्काराने गजभिये सन्मानित

Fri Aug 18 , 2023
नागपूर :- रेल्वे सुरक्षा बलातील सहायक उपनिरीक्षक (एएसआय) शशिकांत गजभिये यांना अतिउत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अजनी येथील क्रीडा मैदानावर झालेल्या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत पांडे यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. गजभिये यांनी 33 वर्षे निष्कलंक सेवा दिली आहे. या काळात कर्तव्य बजावण्यासह त्यांनी भटकलेल्या अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांसोबत भेट घडवून आणून देण्याचे मोलाचे कार्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com