जिल्हास्तरीय सरस विक्री व प्रदर्शनाला २४ मार्च पासून सुरुवात

– ग्रामीण महिलांच्या हस्तकलेतून विविध नाविन्यपूर्ण वस्तूंची निर्मिती 

नागपूर :- येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जि.प.नागपूर अंतर्गत जिल्हा स्तरीय सरस विक्री व प्रदर्शनीचे आयोजन दि.२४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान करण्यात आलेले आहे. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर याठिकाणी प्रदर्शनी पार पडणार आहे. सबंध नागपूर जिल्ह्यातून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तूंची खरेदी नागपूरकरांना या प्रदर्शनीत करायला मिळणार आहे. प्रदर्शनीचे उदघाटन दि.२४ मार्च २०२३ रोजी सकाळी १२ वाजता संपन्न होणार आहे.

अभियानांतर्गत उद्योग करणाऱ्या समूहांना त्यांचे उत्पादन बाजारपेठेत विक्री करतांना इतर उत्पादनाच्या तुलनेत लेबलिंग व पेकेजिंगमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावरून या सर्व समूहांना उत्तम प्रकारचे लेबल डिझाईन करून स्पर्धात्मक लेबलिंग स्विकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे महिलांनी तयार केलेले उत्पादन बाजारपेठेतील इतर नावलौकिक व मागणी असलेल्या उत्पादनांशी स्पर्धा करण्यास सक्षम ठरू शकतो. तसेच महिलांना अनुभव यावा म्हणून भिवापुरी मिरची या उत्पादनाचे उत्तम व युनिक लेबलिंग पेकेजिंग करून उदघाटना प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते या उत्पादनाचे विमोचन करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांना स्वयं रोजगार तथा कायमस्वरुपाची उपजीविका मिळावी या मुख्य उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जि.प.नागपूर तत्परतेने कार्यरत आहे. दरवर्षी विभागीय प्रदर्शनीचे आयोजन मोठ्या व्याप्तीने केले जाते. प्रदर्शनीत दरवर्षी १०० ते १५० स्वयं सहाय्यता समूहांना आपल्या मालाची विक्री करण्याकरिता संधी उपलब्ध करून दिली जाते. यावर्षी देखील ६० समूहांचा सहभाग आहे. त्यात खानावळ करिता १३ समूह तर इतर विविध प्रकारचे उत्पादन करणाऱ्या समूहांचा समावेश आहे. खानावळमध्ये व्हेज, नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध आहे. तर इतर सर्व प्रकारच्या गृहपयोगी वस्तूंची खरेदी आपल्याला करता येणार आहे. प्रदर्शनी पाहण्यासाठी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिक येऊ शकतात. सायंकाळी सुरेल गीतांचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले असून दि.२६ मार्च २०२३ रोजी सारेगामापाच्या गायक व गायिका उपस्थित राहाणर आहेत. त्यासोबत दररोज विविध समूह नृत्य एकल नृत्य, आदिवासी नृत्य अशा विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

उदघाटनाच्या प्रसंगी नागपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्य, जि.प.च्या उपाध्यक्ष, सर्व जि.प. सभापती, सर्व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे. तरी आयोजित प्रदर्शानीला मोठ्या संख्येने भेट देऊन ग्रामीण महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सौम्या शर्मा (भा.प्र.से)- मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नागपूर यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छायाचित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

Fri Mar 24 , 2023
नागपूर :- जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे दि. 24 मार्च हा शेवटचा दिवस असणार आहे. शहरात होत असलेल्या जी-20 निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 24 मार्चपर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी निःशुल्क खुली असणार आहे. झिरो माईलजवळील जिल्हा मध्यवर्ती संग्रहालयात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील दर्जेदार छायाचित्रे यावेळी पहायला मिळणार आहे. नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com