– नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने 24 जानेवारी रोजी
नागपूर :- जिल्ह्यात दररोज २०० युनिट रक्ताची गरज भासते. परंतु उपलब्धता केवळ २५ टक्केच रक्ताची होते. रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णांची जोखिम वाढते आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे. आम्ही आरोग्य क्षेत्रातील एक घटक असून सदैव समाजभिकूख कार्य करीत असतो. समाजऋण फेडण्याच्या एका चांगल्या उद्दीष्टाने आम्ही नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने महारक्तदानाचा संकल्प केला आहे. येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी जिल्ह्यातील २९ ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून, ५००० युनिट रक्त संकलनाचा आमचा संकल्प आहे.
या आयोजनात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट, महाराष्ट्र स्ट्रेट केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन आणि नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांचा समावेश आहे. आमचे आदरनिय अध्यक्ष जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरातील केमिस्ट संघटनांनी एका दिवसात ७५ हजार युनिट रक्तदानाचा संकल्प केला आहे. यामध्ये नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा ५००० रक्त संकलनाचा संकल्प केला आहे. प्रत्येक शिबिराच्या स्थळी स्थानिक आयोजक उदघाटन करणार असून, शिबिर सकाळी ८ पासून सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहे. शिबिरात औषधी व्यवसायाशी निगडित असलेले सर्व सहकारी, जिल्ह्यातील सर्व फार्मसी कॉलेज सहभागी होणार असून, सामान्य जनतेनेही या महारक्तदानात योगदान द्यावे, असे नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव उखरे यांनी आवाहन केले आहे. शिबिरात होणारे रक्तसंकलन हे सरकारी रक्तपेढ्या व खाजगी रक्तपेढीच्या सहकाऱ्याने होईल. पत्रपरिषदेला नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव उखरे, सचिव संजय खोब्रागडे, उपाध्यक्ष दिनेश कुकरेजा, शाम चरोडे, प्रमोद कोल्हे, कोषाध्यक्ष पुनित ठक्कर, सहसचिव नंदकिशोर टापरे, कार्यकारणी सदस्य मनिष मेहाडिया, अमलेन्दु दत्ता (प्रेस पि.आर.ओ.) आदीं उपस्थित होते.
येथे होणार रक्तदान
१)लोहाना महाजन वाडी गांधीबाग
२) आर.संदेश दवा बाजार, गंजीपेठ
३) स्मृति सभागृह, शारदा चौक, जुना सुभेदार लेआऊट
४) पालीवाल सेवा मंडळ, सीताबर्डी
५) रामदेवबाबा रुक्मिणीदेवी मेमोरियल हॉस्पीटल, ओल्ड भंडारा रोड, लकडगंज
६) श्रीमती कुसुमताई वानखेडे कॉलेज ऑफ फार्मसी काटोल
७) संत सावता मंदिर हॉल, कळमेश्वर
८) श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी
९) केडीके कॉलेज ऑफ फार्मसी नंदनवन
१०) गुरुसंगत हॉल, सदर
११) संत गजानन महाराज देवस्थान दत्तवाडी
१२) कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसी, बुटीबोरी
१३) तायवाडे कॉलेज ऑफ फार्मसी, कोराडी
१४) सीताराम महाराज देवस्थान सावनेर
१५) क्षत्रिय किराट समाज भवन, रामटेक
१६) विक्रम मेडिकल, लोकमान्य नगर, हिंगणा
१७) हेडगेवार ब्लड बँक, रामनगर चौक
१८) तिरपुडे ब्लड बँक, टेका नाका चौक
१९) ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (ऐम्स) मिहान
२०) आदर्श इंस्टिटयूट ऑफ फार्मसी, नंदनवन, नागपुर
२१) लता मंगेशकर हॉस्पीटल ब्लड बँक हिंगणा
२२) ज्येष्ठ नागरिक सभागृह, नरेंद्र नगर चौक
२३) समाधा आश्रम, जरीपटका नागपुर,
२४) श्री गुरूसंगत दरबार, खामला, नागपुर
२५) मौदा,
२६) कुही,
२७) उमरेड,
२८) कन्हान,
२९) नैवेघ सेलिब्रेशन हॉल, भिलगाव.