नागपूर :- दि. 21.08.2023 रोजी नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. ऍड. अभिजित वंजारी यांनी नेहरू नगर मनपा झोन कार्यालय अंतर्गत वाठोडा प्रभाग क्र. 26, नेहरू नगर, नंदनवन प्रभाग क्र. 27 तसेच रमना मारोती प्रभाग क्र. 28- ताजबाग प्रभाग क्र. 30 येथील परिसरातील स्वच्छतेकरिता नागपूर महानगर पालिकेकडे कचरा संकलन करणाऱ्या गाडयाची टंचाई असल्यामुळे ती दूर टंचाई दूर करण्याकरिता 40 घंटा (कचरा गाड्या खरेदी करण्याकरिता आपल्या स्थानिक विकास निधीतून 5 लाखाचा निधी नेहरू नगर झोनकरिता मंजूर करून कचरा संकलन गाठ्यांचे वितरण सुध्दा करण्यात आले.
वाठोडा, नेहरू नगर, नंदनवन, रमना मारोती, ताजबाग या परिसरात नेहमीच जागोजागी कचऱ्याचे ढीग पसरल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेथील स्थानिक लोकांच्या बाबाबत सततच्या तक्रारी येत होत्या. मनपाकडे कचरा संकलनाकरिता पर्याप्त गाड्या उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलन करणाऱ्या कर्मचान्यांना याचा त्रास होत होता. नेहरू नगर झोनमध्ये ॲड. अभिजित बजारी गेले असता आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचान्यांनी कचरा संकलनाकरिता पर्याप्त गाढवा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. आमदार अँड अनिजित बंजारी यांनी या समस्येचे निवारण करण्याकरिता आपल्या स्थानिक विकास निधीतून रु. 5 लाख मंजूर करून 40 घंटा (कचरा) गाडयाकरिता नेहरू नगर झोनकरिता दिले.
नेहरू नगर झोनव्या सफाई कर्मचारी यांना प्रत्येक प्रभागात 10-10 गाडयाचे वितरण आमदार ॲड. अभिजित बजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी झोन आरोग्य अधिकारी विठोबा रामटेके व सफाई कर्मचारी उपस्थित होते. मनपा कर्मचान्यांनी नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार ना. अँड. अभिजित वंजारी यांचे आभार मानले.