– भारतीय जैन संघटना सेन्ट्रल नागपूर कडून आयोजन
रामटेक :-स्वर्गीय सुगतचंद्रजी तातेड यांच्या स्मृती प्रीत्यर्थ भारतीय जैन संघटना नागपूर कडून सुरज मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा , एकविरा मतिमंद मुलांचे बालगृह काचुरवाही व स्नेह सदन मतीमंद मुला- मुलींची विशेष अनिवासी / निवासी शाळा शितलवाडी ता. रामटेक जि. नागपूर शाळेत दिव्यांग मुलांना १७५ शालेय गणवेश व १७५ बॅग चे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग मुले अतिशय आनंदी झालेत.
कार्यक्रमा ला यावेळी जितेंद्र बोथरा, मोहित बोथरा, सी.ए. रूपंम बरडिया, सी.ए. सरिता बरडिया, पूजा तातेड, अर्चना श्रावणे, एजुकेअर प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर उपस्थित होते तसेच यावेळी भारतीय जैन संघटना रामटेक चे अध्यक्ष पंकज टक्कामोरे , उपाध्यक्ष नीरज जैन , सचिव प्रशांत टक्कामोरे सह मतिमंद युवक विकास शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कुंभलकर, संस्थापक गणेश गोल्हर, विलास फटिंग , शाळा प्रमुख टि पी जुनघरे ,दिव्यांग व निराधार बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष तुलसीराम अतकर, कोषाद्यष छाया अतकर, शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे सह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी,पालक, मुले बहुसंख्येने उपस्थित होते.