राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ७७० क्षय रुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप

– निक्षय मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले १०० रुग्णांचे पालकत्व 

-पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानात मनपाचा पुढाकार

नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येत्या वर्ष २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने आतापर्यंत नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ७७० क्षय रुग्णांना पोषण कीटचे वितरीत करण्यात येत असून, याकरिता ४९ निक्षय मित्रांची नोंदणी झालेली आहे. हे निक्षय मित्र मनपा कार्यक्षेत्रातील २७११ क्षय रुग्णांना सहयोग करतील. यात निक्षय मित्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० रुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे.

वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोगाला भारतातून हद्दपार करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने नागपुरातला क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला आहे. क्षयरुग्णांना उत्तम औषध उपचाराच्या सुविधेसोबतच पोषण आहार मिळाल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत क्षयरोग बाधित रुग्णांचे पालकत्व घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेने केले आहे. यातच नागपूर शहरातील एकूण ४९ निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे. या ४९ निक्षय मित्रांपैकी २३ निक्षय मित्र हे महानगरपालिका येथील वैद्यकिय अधिकारी व ईतर अधिकारी, कर्मचारी व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील कंत्राटी दोन वैद्यकिय अधिकारी व तीन कर्मचारी आहेत तर उर्वरीत निक्षय मित्र हे मोठे उद्योगपती, समाजात कार्यरत स्वयंसेवी संस्था आहेत. त्यापैकी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी १०० रुग्णांचे पालकत्व घेतले असून, नामांकित उद्योगपतीं पैकी पगारीया ग्रुपने २५० रुग्णांचे, स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थांनचे डॉ. सुभाष राऊत ८१ रुग्णांचे, सहयोग फाउडेशनचे नानक धनवाईन व  संजय सपेलकर यांनी ५० रुग्णाचे सेवा फाउडेशनचे राज खंडारे यांनी २७ रुग्णाचे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिचकार यांनी २२ रुग्णांचे, हल्दीराम कंपनी यांनी २० रुग्णाचे, प्रगल्भ सेवा संस्थाच्या वंदना राम जोशी, डॉ. रश्मी माहुलकर यांनी १० रुग्णाचे, परमात्मा एक बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थाचे भास्कर पराते यांनी १० रुग्णांचे व इतर खाजगी रित्या निक्षय मित्रांनी एक किंवा दोन क्षय रुग्णांचे पालकत्व घेतले आहे. हे निक्षय मित्र ७७० रुग्णांना पोषण कीट वितरीत करणार आहेत.

धरमपेठ झोन अंतर्गत पाच टीबी रुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत धरमपेठ झोन अंतर्गत क्षयरुग्णांना लागणाऱ्या पौष्टिक आहाराचे कीट वाटप करण्यात आले.अभियाना अंतर्गत सहा.आयुक्त प्रकाश वराडे व झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्या हस्ते धरमपेठ झोनमधील पाच टीबी रुग्णांना पोषण आहार कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमात क्षयरुग्णांना पोषण आहाराचे महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच धुम्रपान आणि मदयपानापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आहे. सकस आहाराबरोबर नियमीत व्यायामाचे महत्व रुग्णांना पटवून देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एसटीएस  नितीन बावणे, टीबीएचव्ही शशिकांत वालदे आणि एसटीएलअस श्वेता अग्रवाल यांनी सहकार्य केले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते निक्षय मित्रांचा सत्कार

मागील महिन्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर व अमरावती विभागातील शहर क्षयरोग अधिकारी यांच्यासोबतची आढावा बैठक नागपूरच्या राजभवन पार पडली. बैठकी दरम्यान चार निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला होता. यात पगारीया ग्रुपचे संचालक उज्वल पगारीया, स्व. श्री. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत,सहयोग फांउडेशनचे अध्यक्ष नानक धनवाईन, सहयोग फांउडेशनचे सचिव संजय सपेलकर यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते.

क्षयरुग्णांना मदत करा 

“क्षयरोग मुक्त भारत” उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी शहर क्षयरोग कार्यालयामार्फत यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे या यंत्रणेद्वारे नागपूर शहराअंतर्गत उपचारा खालील क्षयरुग्णांना किमान एक वर्षासाठी अपेक्षित आहे. सामाजिक संस्था अथवा व्यक्तींनी टीबी रुग्णांना दत्तक घेवून पोषण आहार सहाय्य, व्यावसायिक समर्थन, निदानात्मक सहाय्याद्वारे मदत प्रदान करणे अपेक्षीत आहे. योजनेअंतर्गत ज्यांना वरील स्वरुपात क्षयरुग्णांना स्वईच्छेने काही मदत करावयाची असेल तर सहभाग नोंदवावा. उपरोक्त मोहिमेमध्ये आपण आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहायता म्हणुन वरील बाबींसाठी तरी उपरोक्त योजनेमध्ये आपण आपल्या कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना सहायता म्हणून वरिल बाबीसाठी सहभाग नोंदवावा तसेच https://tbcindia.gov.in या निक्षय पोर्टलवर स्वतःचे / संस्थांचे रजिस्ट्रेशन करावे किंवा शहर क्षयरोग कार्यालय , सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र , रेसीडेन्सी रोड , कॅनरा बँकेसमोर , सदर नागपूर येथे प्रत्यक्ष भेट देवून किंवा dtomhngc@rntcp.org या ई – मेल आयडी द्वारे निक्षय मित्र म्हणुन संपर्क साधू शकता असे आवाहन करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनोज - विनोद की गैरकानूनी नियुक्ति से महाजेनको को डेढ़ करोड़ का चुना लगा 

Wed Jan 4 , 2023
– सुरेश पाटिल ने महाजेनको व्यवस्थापकीय संचालक सह अध्यक्ष से नियमानुसार कार्रवाई करने की मांग की हैं. नागपुर :- मनोज रानाडे और विनोद बोंद्रे की महाजेनको में अवैध नियुक्ति और उन पर हुए खर्च के खिलाफ सुरेश पाटिल ने नियमानुसार कार्रवाई सह वसूली करने की मांग महाजेनको व्यवस्थापकीय संचालक सह अध्यक्ष से की हैं. मनोज रानाडे : प्राप्त जानकारी के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com