नागपूर :- प्रयास ग्रीन सिटी संस्था या स्वयंसेवी संस्थेद्वारे मनपा नागपूर च्या संजय नगर हिंदी माध्यमिक शाळा येथे नोटबुक वितरणाचा कार्यक्रम आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. प्रत्येक विद्यार्थ्यास पाच नोटबुक देण्यात आले. एकूण 550 विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर नगरीचे डी.सी.पी श्री अनिकेत कदम उपस्थित होते, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे तथा मनपा कर अधीक्षक संजय दहिकर, ट्रॅफिक पोलिस इन्स्पेक्टर वैरागडे ,प्रयास ग्रीन सिटी या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विनोद कोचर तथा सचिव संतोष अग्रवाल उपस्थित होते.
टिळक विद्यालयच्या प्राचार्य डॉ सुमेधा ठाकूर, प्रयास ग्रीन सिटी चे सन्माननीय सदस्य वसंत पांचाली, संतोष लश्कर, जगदीश सोनी, मनोज पुरोहित अशोक बंब व संजय बैतुले हे सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी संजय नगर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गीता दांडेकर यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.आभा पांडे डी.सी.पी पोलिस कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधु पराड यांनी व आभार प्रदर्शन डॉ. मीनाक्षी भोयर यांनी केले.