कामठीत दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वितरण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- दिव्यांग आणि वयोवृद्धाची समाजात उपेक्षा केली जाते त्यांना कुठलाही कमीपणा वाटू नये म्हणून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सहकार्या ने आवश्यक साहित्याचे वितरण निशुल्क करण्यात आले असे प्रतिपादन भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी केले.

येथील एम टी डी सी सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते दिव्यांगजन आणि राष्ट्रीय वयोश्री अंतर्गत जेष्ट नागरिकाना कृत्रिम साहित्यचे वितरण उज्वल रायबोले यांनी केले प्रभाग 15 तील वसीम रजा हैदरी,शेख अशफाक,मोहम्मद रहमान,एकनाथ रामटेके,कुंदा राऊत, चांगोनाबाई चव्हाण, आशय तांबे,धनराज यादव,अरुण पौनिकर,विनय फुले, सुभाष राऊत, आशय पिल्लेवान या दिव्यांग लाभार्थीनां आवश्यक साहित्य प्रदान केले.

प स च्या खंड विकास अधिकारी अंशुजा गराटे, न प कामठी चे मुख्याधिकारी संदीप बोरकर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय माने, नागरी आरोग्य प्रकल्प च्या डॉ शबनम खानूनी प्रामुख्याने उपस्थित होते या वेळी प्रभाग 15 तील जवळपास 40 लाभार्थीना साहित्य वितरण करण्यात आले.

विक्की बोंबले, विकास कठाने,अरविंद चवडे, रोहित दहाट, दिनेश खेडकर, अमर समरीत, अजित शाहू,विक्की वाहने, गोलू लिल्हारे, प्रज्वल सौलंकी,जितेंद्र खोब्रागडे,कुंदा पिल्लेवान, राणी कांबळे,सुकेशिनी गजभिये,नेहा शहारे, सरोज बागडे, रोशनी कानफाडे, निशा मेश्राम,तनवीर बेगम यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते "महिलांसाठीच्या शासकीय योजना" पुस्तिकेचे विमोचन

Wed Apr 19 , 2023
गडचिरोली :- आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील व दुर्गम भागाने व्याप्त गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुस्तिका तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “महिलांसाठीच्या शासकीय योजना” ही पुस्तिका तयार करण्यात आली. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com