कन्हान/कांद्री :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना कार्यालय कन्हान येथे माजी जिल्हापरिषद सभापतीे हर्षवर्धन निकोसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामटेक विधानसभा आमदार अँड.आशिष जयस्वाल होते. व ध्वजारोहण होताच क्षेत्रातील 10 गरजू महिला यांना सिलाई मशीन, 10 परिवाराना ताडपत्री, 3 मुलांना सायकल, 2 दिव्यांग लोकांना व्हील चेयर,4 वृद्ध लोकांना कमोट,भजन मंडळ यांना भजन करण्याचे साहित्य,बखारी येथील कबड्डी टीम यांना ट्र्र्याक सूट, अश्या प्रकारे लोकांना रामटेक विधानसभा आमदार अँड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले व तसेच आमदार अँड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते माजी सैनिक यांचा पण सत्कार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रामुख्याने नगर परिषद कन्हान पिपरी नगराध्यक्ष करुणा आष्टणकर,उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले, माजी उपाध्यक्ष नगरपरिषद डायनल शेंडे,तालुका प्रमुख राजु भोसकर ,माजी नगर सेवक अनिल ठाकरे ),वैद्यकीय आघाडी, प्रमुख गौरव पनवेलकर, संचालक स्मारक परमेडिकल् कॉलेज महेंद्र कुर्वे ,माजी जि.परिषद सभापति गजानन गजभीये,शहर प्रमुख छोटू राणे, नंदा घोगळे, शहर प्रमुख मनीषा चिखले, लता लंडूरे,सुनीता वैद्य,उपस्थित होतेे. आमदार जयस्वाल यांनी महिलाना बचत गटा बदल माहिती देऊन त्यांना रोजगार कसा मिळवता येईल या बदल माहिती दिली, त्यांना बचत गटाचे फायदे समजावुन सांगितले, त्यानी तसेच वेग वेगळ्या, योजना बदल लोकांचे मार्गदर्शन केले.
तसेच जिल्हाप्रमुख वर्धराज पिल्ले यांनी कन्हान ईथे सुरु झालेल्या आपल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालया बदल महिती दिली, तिथे होणाऱ्या निरनिराळया कामा बदल लोकांना कार्यलयात येऊंन त्यानी त्यांनच्या अडचनी सांगुन आपल्या अडचनी सोडुन घेण्याचे आवहान जनतेला केले.
तसेच या कर्यक्रमात एक सन्मानित महिला म्हणून लाभलेली शोभा वतेकर ज्यांनी आपले 20 वर्ष अश्या गोरग़रीब मुलांना त्यांना त्यांच्या घरी जाऊंन शिकवले, त्यांच्या सन्मानात त्यांना सायकल भेट देण्यात आली, तसेच या कर्यक्रमात स्मारक परमेडिकल कॉलेज च्या विधार्थीयानी कोवीड च्या कलावधित घडलेल्या परिस्थिति वर आधारित सुंदर अशे एक नाटक प्रस्तुत केले.यावेळी पूजा सुगंधे,कुंदा मोटघरे, वैशाली श्रीखंडे, कल्पना नागरकर, ममता दास,प्रतिभा पौनीकर,विद्या बहादुले, सविता पाली,संगीता पोटभरे,तेजस्विनी शेंडे ,ऋतुजा चिखले, माधुरी चिखले,मुक्ता प्रसाद, दीपा मंकानी,राधा लोडेकर,मनीषा लोखंडे,रेखा, दीपाली बागडे,प्रदीप गायकवाड,भूषण खंडाते, सोनु खान, राहुल गोरले,गज्जू गोरले, विजय खडसे,क्षीईरी शिंडे, ऋषि नगरकर, नाना ऊके, दामु बडं, आकाश भगत, विकास घरपिंडे, सनी सिंह, राहुल बावने, शरद वाटकर, अभिषेक तांडेकर, मनोज बैटवार , रवि कुर्वे, मोहीत काले, शैलेश झेंडे ,नरेश पुरवले, मोरेशवर खडसे ,राहुल गोरले, गज्जू,श्रीचंद शेन्डे ,तनु पिल्ले,बाबू पिल्ले, इनेश ,व मोठ्या संख्येने समस्त गावकरी उपस्थित होते.