कोदामेंढी :- आनंदाच्या शिधा श्री गणेश उत्सव काळात देण्याचे शासनाने जाहीर केले होते .मात्र तो त्या काळात उपलब्ध न झाल्याने येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामठी – मौदा विधानसभेचे तडफदार आमदार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
त्या तक्रारीची दखल घेत संबंधित अन्नपुरवठा विभागाने आनंदाच्या शिधा येथील राशन दुकानात उपलब्ध केला असून येथील राशन दुकानदाराने आनंदाच्या शिधाचे वाटप दिनांक सात आक्टोंबर सोमवारपासून केले असून श्री गणेश उत्सव काळात मिळणारा आनंदाच्या शिधा उशिरा का होईना नवदुर्गा उत्सव काळात मिळाल्याने येथील नागरिकांनी महाराष्ट्र शासनासह कामठी – मौदा विधानसभेचे तडफदार आमदार टेकचंद सावरकर यांचे आभार मानले आहे.