शेतकरी, शेतमजुरांना घोंगशी चे वितरण

– चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर) तर्फे वितरण

– रामटेक तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूरांना दिल्या घोंगशी

रामटेक :- दिनांक २४ जुलै रोज सोमवारला चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसर च्या वतीने रामटेक तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना ऐन पावसाळ्यात उपयोगी पडणाऱ्या घोंगशी चे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकरी, शेतमजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

रामटेक तालुक्यातील पवनी, देवलापार, निमटोला, कडबीखेडा, उरसिपार, सावरा, कट्टा, सिंदेवानी, खिडकी, टुयापार, उमरी, जुनेवानी, वडांबा, दुधाळा (कवडक), पिंडकापार (सोन.), सोनपुर, महाराजपूर परीसरातील शेतात धान रोवनी करित असताना पावसापासून त्यांचे संरक्षण व्हावे करिता धोंगशी वाटप करण्यात आल्या.

यावेळी प्रामुख्याने  रामप्रसाद कोकोडे, शिवराम वरठी, मोतीराम खंडाते, माधव वाहने, सुरेंद्र बिरणवार, अशोक येलेकर, अनुराधा कोडापे, बंडू वाढीवे, अक्षय सयाम, अमोल कोकोडे, योगराज कुंभरे, राजेराम कुमरे, योगिता कुमरे, हंसाबाई उईके, विश्वनाथ टेकाम, ईश्वर वरठी, श्यामरी वरठी, प्रिया वरठी, शेखर वरठी, मधू टेकाम, लक्ष्मी देशमुख, दुर्गा मंदेवार, वंदना पदमाकर, देशराज धुर्वे, महेश धुर्वे, प्रीतम भलावी आदी. उपस्थित होते.

पावसाळ्यात विशेषतः धान रोवणी करतांना शेतकरी, शेतमजुरांना छत्री ची नव्हे तर घोंगशी ची गरज भासत असते. घोंगशी डोक्यावरुन पाठीच्या भागाने ठेवुन दोन्ही हात कामी लावता येते. नेमकी हिच बाब चंद्रपाल चौकसे यांनी हेरुन आपल्या कर्मचाऱ्यांना तसे आदेशित केले. त्यानुसार काल दि. २४ जुलै ला शेतकरी, शेतमजुरांना घोंगशी चे वितरण करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

Wed Jul 26 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.25) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. तेज उर्जा इंन्टरप्राईजेस, बुटी लेआऊट, नागपूर यांच्यावर बांधकाम साहित्याचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. कलश आर्युवेदिक, राम नगर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com