– सोबतच बालकांची तज्ञ डॉक्टर्स कडून आरोग्य तपासणी आणि रक्त चाचण्या आणि औषधांचे वाटप…
– औचित्य वाढदिवसाचे… शिबिराला प्रचंड प्रतिसाद… जवळपास ४५० बालकांना मिळाला लाभ…
नागपूर :- मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे आक्रमक नेतृत्व अनिल हमदापुरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कुपोषित बालकांना प्रोटीन पावडर, पोषक आहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन स्थानिक टिळक स्मारक येथे २८ जाने. रोजी करण्यात आले होते.कार्यक्रमाचे आयोजन अनिल हमदापुरे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते. या शिबिराला प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनसेचे अनिल हमदापुरे, डॉक्टर सचिन तारक, डॉक्टर अनिल आखरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्व कुपोषित बालकांना पोषण आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचलन तिलक गुगलीया तर आभार प्रदर्शन सौरभ अनसिंगकर यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला.
यवतमाळ जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर काहीतरी सकारात्मक उपाययोजना व्हावी या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा होत असून शासन कुठे तरी कमी पडत असल्याचा अनुभव या शिबिराच्या माध्यमातून आला. या शिबिराला सर्वप्रथम अंदाजे 300 बालक येतील असा अंदाज होता परंतु जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करतोय याचा अंदाज शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून आला. या शिबिरात जवळपास ४५०कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी झाली. सोबतच त्यांच्या रक्त चाचण्या पण मोफत करण्यात आल्या.
या शिबिराला यवतमाळ येथील बालरोग तज्ञ डॉ.अनिल आखरे, डॉक्टर सचिन तारक, डॉ.अमित व्यवहारे, डॉक्टर स्वप्नील मानकर, डॉ.नागेश व्यवहारे , डॉक्टर हर्षा साव, डॉक्टर संध्या चांगाडे,डॉ. प्रिया अनिल हमदापुरे यांनी बालकांची तपासणी केली यावेळी सर्व बालकांना उत्तम दर्जाचे औषधी चे वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात आलेल्या बालकांना मोफत एका किट चे वाटप करण्यात आले त्यात प्रामुख्याने एक डबा प्रोटीन पावडर, 2 बॉटल मल्टिव्हिटॅमिन , शेंगदाणा लाडु पाकीट, पेंड खजुर पाकीट, राजगिरा लाडु २पाकीट, तसेच दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.या शिबिरात अतिदुर्गम भागातील बालकांचीही नोंदणी करण्यात आली जे प्रवाहापासून वंचित राहतात. येणाऱ्या काळात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात याप्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचा मानस या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी बोलून दाखवला.जिथे शासन कमी पडेल तिथे मनसे पोहचेल असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणचे या पूर्वीही विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आज पर्यंत जवळपास ५०० बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया, कॉकलीयर एम्प्लान्ट, बोन म्यारो,पायाची शस्त्रक्रिया,नेत्र शस्त्रक्रिया, कोरोना काळातील सामाजिक कार्य सह अनेक समाज उपयोगी उपक्रम अविरत पणे सुरू असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली, मनसेच्या धोरणानुसार जनसेवा हीच ईश्वर सेवा असुन या कार्याची प्रेरणा माझे आई-बाबा, पत्नी,कुटुंब यांच्याकडून मिळत असल्याचे मत या प्रसंगी अनिल हमदापुरे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विशेष करून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. गंगाथडे , डॉक्टर हर्षा साव , डॉक्टर संध्या चांगाडे, डॉक्टर प्राजक्ता जायदे, डॉक्टर जयश्री दिघडे, डॉक्टर अश्विन कोल्हे,फार्मासिस्ट चंद्रशेखर खरतडे , फार्म. सोना तलरेजा, ममता कापसे ,अर्चना मेश्राम, जयश्री चांदोरे , चित्रलेखा गेडाम, कुंदा टाके, प्रीतम भगत, या सर्व जिल्हाशल्य चिकित्स कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे तपासणी नोंदणीसाठी विशेष सहकार्य लाभले यासह या प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी कुणाल पिसोळे आणि सर्व औषधी वाटपकर्ते आणि परिचारिका ,अंगणवाडी सेविका सीमा क्षीरसागर , वर्षा राठोड , अर्चना हुमणे, कुमुदिनी नागपुरे, माधुरी भारती, प्रीती डफडे, वर्षा वानखेडे, संगीता ताकसांडे, संगीता भेंडे, प्रतिभा कायकुटे, रेशमा गौरकर,यांनी विशेष सहकार्य दिले. या शिबिरासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, तसेच एमएसएमआरए संघटनेचे अमोल चौधरी, सतीश खडसे, निशांत पेन्शनवर, ब्रिजेश त्रिपाठी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिराला प्रामुख्याने शिवसेनेचे विकास पवार, निलेश लडके, अनिल सोळंकी, जिल्हा परिषद पतपेढीचे अध्यक्ष सोनेकर सर, वंचित बहुजन आघाडी च्या महिला जिल्हाध्यक्ष वासनिक ताई यांनी सदिच्छा भेट दिली. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी अंजली पारधे, तिलक गुगलीया, तुषाल चोंडके, सोनू गुप्ता, सौरभ अनसिंगकर, नरेश गंगावणे, पुंजाराम भुसनर, पिंटू तोरकडी , हेमंत जोशी, सुधांशू काळे, गौरव दरणे, ऋषिकेश हळदे, साईराम कवाडे, मनसेचे तालुकाध्यक्ष आर्णी सचिन येलगंधेवार, संदीप गाडगे, दिपक आडे, आक्रोश पवार,सालिक भाई,पद्मनाभ जोशी,यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात बालकांचे पालक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.