मुंबई :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व त्यालाच जोडलेला डेस्क अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे (IEC KIT) वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार भरत गोगावले यांच्यासह मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे मुख्य समन्वयक मनोज घोडे पाटील, आयटीसी कंपनी, एएफएआरएम (AFARM), फिनिश सोसायटीचे प्रतिनिधी व लाभार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये शेती साहित्याबरोबर वैयक्तिक उपयोगाच्या गोष्टींचा समावेश असल्याने त्याचा या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तर नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य ( IEC KIT) मुलांना उपलब्ध होणार असल्याने या मुलांची जाण वाढविण्याच्या दृष्टीने आईसी (Information, Education & Communication) किट उपयुक्त ठरणार आहे.