व्हॉइस ऑफ मीडियाचा प्रतिभावंत होतकरू कलावंतांसाठीचा उपक्रम ; राज्यातील 16 कलावंतांना प्रत्येकी 50 हजारांची फेलोशिप.
नांदेड :- व्हॉइस ऑफ मीडियाने राज्यातील होतकरू प्रतिभावंत फोटोग्राफर व व्यंगचित्रकार यांच्यासाठी जाहीर केलेल्या ‘ चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिप ‘ चे नांदेड येथील भव्य कार्यक्रमात वितरण करण्यात आले. प्रत्येकी 50 हजार रुपये रकमेचे धनादेश प्रातिनिधीक स्वरूपात या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
नांदेड येथील कुसुम सभागृहात चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिप ‘ सोहळा पार पडला. या सोहळ्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रमेश कदम, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास भोसले, नांदेड साप्ताहिक अध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात गझल गायक गझल नवाझ भीमराव पांचाळे, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील,साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश गायकवाड, चित्रकार संतोष घोंगडे यांच्या हस्ते फेलोशिपचे वाटप करण्यात आले. एक व्यंगचित्रकार व एक छायाचित्रकार अशा दोघांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची फेलोशिप देण्यात आली.
व्हॉइस ऑफ मीडियाने ही फेलोशिप जाहीर केल्यानंतर देशभरातून देशभरातून 140 जणांनी यासाठी नामांकन केलेले होते. त्यातील 16 जणांची देशभरातून निवड झाली.
8 फोटोग्राफर व 8 व्यंगचित्रकार यांनाही फेलोशिप जाहीर करण्यात आली आहे.
वेगवेगळ्या प्रोजेक्ट व विषयांवर हे फोटोग्राफर व व्यंगचित्रकार रिसर्च करणार आहेत. या फेलोशिपच्या माध्यमातून चित्रकार, व्यंगचित्रकार त्यांच्या कलांना उजाळा मिळणार आहे. अनेक प्रोजेक्ट या निमित्ताने पुढे येणार आहेत. नवीन प्रोजेक्ट करण्याच्या अनुषंगाने ही फेलोशिप उपयुक्त ठरणार आहे. व्हॉइस ऑफ मीडियाने नवीन कलावंतांना प्रोत्साहन देत वेगळं काहीतरी करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे.
व्हॉइस ऑफ मीडियाने नेहमीच नवीन तंत्रज्ञानचा वापर करत नवनिर्मिती करणाऱ्या कलावंतांना नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही फेलोशिप आहे. या फेलोशिप गरजू प्रतिभावंत कलावंतांच्या कलानिर्मितीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.ही कलावंत मंडळी या क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम करतील. असे यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष रमेश कदम म्हणाले.
देशभरात झपाट्याने वाढत असलेली ही संघटना असे नवनवीन उपक्रम राबवून प्रत्येकाला आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी निर्माण करून देत आहे. पत्रकारितेशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला संघटना सामावून घेऊन त्यांना यथोचित सन्मान करीत आहे, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास भोसले म्हणाले.
संगमेश्वर लांडगे, नांदेड साप्ताहिक विंग अध्यक्ष यांचेही यावेळी भाषण झाले.
या फेलोशिपच्या माध्यमातून छायाचित्रकार व व्यंगचित्रकार यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांच्या अनुभवाचा उपयोग इतर व्यंगचित्रकार चित्रकारांना व्हावा या उद्देशाने ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. या क्षेत्रामध्ये नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांसाठी देखील ही संधी राहणार आहे.
– संदीप काळे
राष्ट्रीय अध्यक्ष , व्हॉइस ऑफ मीडिया.
फोटो ओळ: नांदेड येथील कुसुम सभागृहात चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिप ‘ सोहळा पार पडला. या सोहळ्यात व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रमेश कदम, नांदेड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास भोसले, नांदेड साप्ताहिक अध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रख्यात गझल गायक गझल नवाझ भीमराव पांचाळे, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील,साहित्यिक डॉ.सुरेश सावंत, ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेश गायकवाड, चित्रकार संतोष घोंगडे यांच्या हस्ते फेलोशिपचे वाटप करण्यात आले.