संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सर्व सामान्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवीण्यात येत आहे.या योजनेअंतर्गत कामठी तालुक्यातील 303 घरकुल लाभार्थ्याना मंजुरी देण्यात आली असून प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले गतीने पूर्ण करण्यासाठी कामठी पंचायत समिती प्रशासन कटिबद्ध आहे लाभार्थ्यांनीही यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब येवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालेवाडी पुणे येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरीय कार्यक्रमात सहभागी होताना लाभार्थ्याना घरकुल मंजुरी पत्र वितरण करताना व्यक्त केले.
त्यानुसार कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मधील 303 घरकुल लाभार्थ्याना मंजुरी पत्र वितरित करण्यात आले.ज्यामध्ये आडका 2,आजनी 11,आवंढी 7,भामेवाडा 2,भिलगाव 2,भुगाव 10,चिकना 2,चिखली 4,दिघोरी 2,गादा 5,गारला 9,घोरपड 21,गुमथळा 3,जाखेगाव 9,कढोली 7,कापसी 5,कवठा 1,केम 5,केसोरी 1,खैरी 1,खापा 3,खसाळा 5,खेडी 2,लिहिगाव 6,महालगाव 1,नान्हा 5,नेरी 19,परसाड 15,पावनगाव 7,रणाळा 11,सीवनी 3, सोनेगाव 13,सुरादेवी 7,तरोडी 1,टेमसना 44,उमरी 5,वडोदा 5,वरंभा 5,वारेंगाव 30, येरखेडाच्या 2 लाभार्थ्याना घरकुल मंजुरी पत्र वितरित करण्यात आले.