नागपूर :-शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आज रामटेक व मौदा येथे उपविभागीय आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते हार्वेस्टर, ट्रॅक्टर, बी-बियाणे व विविध कृषी साहित्याचे वाटप तसेच इतर लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हात शासन आपल्या दारी अभियानातंर्गत उपविभागीय स्तरावर आढावा बैठकी सुरू केल्या आहेत.या योजनेंतर्गत नुकतेच १९ व २० मे रोजी हिंगणा, उमरेड, सावनेर, काटोल या उपविभागात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध लाभ देण्यात आला होता. आज रामटेक व मौदा येथे पुढील टप्यातील उपविभागिय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी कृषी यांत्रिकिकरण उप अभियान अंतर्गत योगेश मोतरकर यांना कंबाइन हार्वेस्टर, किसनाबाई तिपाडे, अलका कुथे, रेखा हटवार व प्रकाश इखार यांना नवीन ट्रॅक्टरची चाबी देण्यांत आली. ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रत्येकी एक लाख २५ हजार अनुदान देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री याच्या हस्ते विविध योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र लाभार्थींना प्रतिनिधिक स्वरूपात देण्यात आले. यात सुखचरण अडमाची, भिकु परतेती, सहदेव आतराम, रामकिसन अडमाची यांना वनहक्क पट्टे वाटपाचे प्रमाणपत्र वितरित करण्यांत आले. शासकीय जागेवर अतिक्रमण करून निवास करणा-या व्यक्तींना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत शकुंतला दमाहे, गीता चौरे, देवचंद केळवदे, विमल हावरे, शालीनी कोल्हे या लाभार्थींना प्रातिनिधिक पट्टे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संविधान महिला बचत गट, देविका महिला बचत गट, जय श्रीराम महिला बचत गट, सहेली महिला बचत गट यांना अंतर्गत कर्ज वाटप धनादेश देण्यात आले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेतांना रोजगारास मदत व्हावी म्हणून सुरज मोहकर, जिजाबाई क्षीरसागर, शालू सातपैसे, नामदेव सातपैसे यांना प्रत्येकी २० हजार कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले. सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत नीलकंठ येलुरे, सुनंदा उइके, मीरा कुंभरे या अतिक्रमणधारकांची निवासी अतिक्रमण नियमित करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी साहित्याचे वाटप
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com