नागपूर :- दिवाळी निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गट यांचे शहरी उपजीविका केंद्र,नवलाई शहरस्तर संघाद्वारे बचत गटांद्वारे तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मनपा मुख्यालयासह सर्व दहाही झोन कार्यालयात लावण्यात आले आहे. हे प्रदर्शन पुढील दोन दिवस चालणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येत प्रदर्शनाला भेट देत खरेदी करावी असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
दिवाळीचे औचित्य साधून फराळ, घर सुशोभीकरणाच्या वस्तू, आकाश कंदील, दिवे आदी वस्तू नागरिकांना माफक दरात उपलब्ध व्हाव्यात, तसेच या माध्यमातून महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता महिला बचत तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मनपा मुख्यालयातील दालनात लावण्यात आली आहे.
मनपाच्या समाज कल्याण विभाग दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत मनपाचे उपायुक्त विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण अधिकारी श्रीमती रंजना लाडे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रदर्शनात दिवाळीनिमित्त फराळ, शोभेच्या वस्तू, आकाश दिवे, मातीचे दिवे,(पणत्या) दिवाळीचे तोरण आदी वस्तू विक्रीसाठी भेटण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.