बसपाची प्रदेश कार्यकारणी बरखास्त 

– एड परमेश्वर गोणारे प्रदेश अध्यक्षपदी

नागपूर :-बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकर्त्यांची बैठक आज लखनऊ येथे बहन मायावती यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. त्यात ऍड संदीप ताजणे यांच्या नेतृत्वातील प्रदेश कार्यकारणी बरखास्त करून ऍड परमेश्वर गोणारे (नांदेड) यांची प्रदेश अध्यक्षपदी निवड केली.

ऍड परमेश्वर गोणारे हे आदिवासी समाजातील प्रसिद्ध नेते असून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतली असून ते बसपात सक्रियरित्या कार्यरत आहेत.

बहन मायावती यांनी संदीप ताजने ला अध्यक्ष पदावरून बरखास्त केल्यावर त्याची उपाध्यक्ष पदी निवड करून त्यांच्यावर फक्त मुंबईची जबाबदारी दिली. तर प्रदेश महासचिव म्हणून ऍड सुनील डोंगरे (विदर्भ), मनीष कावळे (मराठवाडा), डॉ प्रशांत इंगळे (खानदेश), डॉ हुलगेश चलवादी (कोकण) यांची निवड केली. ह्यांना त्या-त्या विभागाचा प्रभार दिलेला आहे. त्यांच्या सोबतीला दोन-दोन प्रदेश सचिव देण्यात आले.

प्रदेश प्रभारी म्हणून नॅशनल कॉर्डिनेटर रामजी गौतम व नितीन सिंग यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.

ऍड सुनील डोंगरे त्यांना विदर्भाचे इन्चार्ज केले असून यांच्या मदतीला प्रदेश सचिव म्हणून पृथ्वीराज शेंडे व इंजि. दादाराव उईके यांची निवड केली आहे. तर नागोराव जयकर ह्याला कमिटी बाहेर ठेवले आहे.

संदीप मेश्राम पुन्हा जिल्हाध्यक्षपदी 

संदीप मेश्राम हे मागील अनेक दिवसापासून नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. चार महिन्यापूर्वी त्यांच्या जागेवर ओपुल तामगाडगे याची निवड करण्यात आली होती. परंतु त्याच्या पक्षविरोधी कारवाया वरिष्ठांच्या लक्षात आल्याने आज बहनजी ने त्याची पक्षातून हाकलपट्टी करून त्या ठिकाणी पुन्हा संदीप मेश्राम यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे कार्यालयीन सचिव व मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शनिवारी पंतप्रधान साधणार लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद

Fri Dec 15 , 2023
– दयानंद पार्क येथे विकसित भारत संकल्प यात्रा नागपूर :- विकसीत भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध भागातील लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत. शनिवारी १६ डिसेंबर २०२३ रोजी विकसीत भारत संकल्प यात्रा नागपूर शहरात जरीपटका येथील दयानंद पार्क परिसरात सकाळी १०.३० वाजतापासून असेल आणि यामध्ये पंतप्रधानांचा दृश्य श्राव्य माध्यमातून लाभार्थ्यांशी संवाद साधतील. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com