– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 11;-कामठी तालुक्यातील दिशा फाऊंडेशन सावळी ला नेहरू युवा केंद्र नागपूर(युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार) व स्पर्श जनहिताय बहुउद्देशीय संस्था नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा युवा संमेलनात विविध क्रीडा साहित्य प्रधान करून त्यांचा गौरव करण्यात आला.दिनांक ०९ मार्च २०२२ रोजी कस्तुरबा भवन,बजाज नगर नागपुर येथे ह्या युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे,अध्यक्ष .जिल्हाधिकारी आर.विमला, महापौर दयाशंकर तिवारी, उपनिर्देशक शरद साळुंके,जिल्हा युवा अधिकारी उदयविर व कपिल आदमने उपस्थित होते..
खासदार विकास महात्मे यांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्याबद्दल कौतुक केले व युवकांना सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल यावर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी आर.विमला यांनी युवकांनी पुढे असणारे आव्हान कसे पार पाडता येईल यावर मार्गदर्शन केलेत..दयाशंकर तिवारी यांनी विविध शासकीय योजनेवर भर देऊन युवकांचे लक्ष वेधले.शरद साळुंके यांनी युवा युवतींना प्रोत्साहित करून नेहरू युवा केंद्र यांच्याशी मोठ्या प्रमाणात जुडण्यास आवाहन केले.कपिल आदमणे यांनी युवा केंद्रातील स्वतःचा जुना अनुभव सांगून युवांना मोठ्या प्रमाणात असलेल्या संधी लक्षात आणून दिल्या..
जिल्ह्यातील दिशा फाऊंडेशन सावळी ला व विविध युवा मंडळांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले..कार्यक्रमाचे संचालन निशांत डहाके यांनी केले,संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय युवा कोर यांनी मेहनत घेतली..कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली..दिशा फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रशांत महल्ले, इंद्रजित रोकडे दिप्ती महल्ले यांना कीट देण्यात आली..
दिशा फाऊंडेशन सावळी ला मिळाले क्रीडा साहित्य…
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com