संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामठी नगर विजयादशमी उत्सव
कामठी :- शिस्तबद्ध पथसंचलन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैशिष्ट्य मानले जाते.त्यानुसार विजयादशमी पर्वाचे औचित्य साधून आज 29 ऑक्टोबर ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामठी नगर तर्फे शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले.
हे शिस्तबद्ध पथसंचलन संघ मैदान कामठी येथून शुभारंभ होत दाल ओली नं 02, नेताजी चौक, बोरकर चौक , सोनार ओली , फूल ओली , सत्तू हलवाई चौक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दुर्गा चौक , हैदरी चौक, चावड़ी चौक, दाल ओली नं 1 मार्गाने मार्गक्रमण करीत परत संघ मैदानात पोहोचले.या पथसंचलन मध्ये घोषपथकासह मोठ्या संख्येने गणवेशात स्वयंसेवक सहभागी झाले होते.पथसंचलनाचे ठिकठिकानी पूष्पवृष्टी करून फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
कामठी येथील राम मंदिर जवळील संघ मैदानात विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला होता,दरम्यान स्वयंसेवकांचा शस्त्र पूजन व विजयादशमी उत्सव पार पडला. या कार्क्रमाचे प्रमुख पाहुणे स्वामी शांतीप्रकाश प्रेमप्रकाश आश्रम कामठीचे कार्याध्यक्ष महेशजी दयानी तर मुख्य वक्ता विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख अरविंद कुकडे होते . यावेळी कामठी नगर संघचालक मुकेश चकोले तसेच नगर कार्यवाह आकाश भोगे सह कामठी शहरातील बहुसंख्येने स्वयंसेवक हजर होते.