– केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवले निवेदन
भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांच्या हातामध्ये देण्यात आल्यामुळे भंडारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल निषेध करण्याकरिता कार्यकर्तेसह पदाधिकारी यांनी रस्त्यावर उतरून निषेध केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हाबद्दल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे पदाधिकारी व सामान्य जनतेला निवडणूक आयोगाचा निर्णय न पटणारा असल्याने निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय यावर फेरविचार करण्यासाठी भंडारा जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय आयोगाला निवेदन दिले.
यावेळी नरेश ईश्वरकर भंडारा जिल्हा संघटन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा युवक अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे, महिला अध्यक्ष अनिता गजभीये व अनुसूचित जमाती सेल जिल्हाध्यक्ष नरहरी वरकडे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, सहकार सेल अध्यक्ष सुखराम अतकरी, भटक्या विमुक्त जमाती अध्यक्ष राजेश शिवरकर, मच्छीमार किसान सेल ग्राहक सेल डॉ. येळणे, विधानसभा अध्यक्ष तुमसर एकनाथ फेंडर जिल्हा परिषद सदस्य, भंडारा-पवनी अध्यक्ष अजय मेश्राम, लाखांदूर -साकोली अध्यक्ष देवानंद नागदेवे, सोनुले जिल्हा सरचिटणीस, मधुकर चौधरी भंडारा शहर अध्यक्ष, शाहीना पठाण महिला भंडारा शहर अध्यक्षा, लाखांदूर तालुका अध्यक्ष नरेश दिवठे, लाखनी तालुका अध्यक्ष यशवंत चानोरे, मोहाडी तालुका अध्यक्ष श्याम कांबळे, पवनी तालुका अध्यक्ष कुनाल पवार, भंडारा तालुका अध्यक्ष ईश्वर कळंबे, साकोली तालुका अध्यक्ष विलास कडुकर, तुमसर तालुका अध्यक्ष जितेंद्र तुरकर, नीलिमा रामटेके, राकेश श्यामकूवर, नितीन तलमले, नितीन पडोळे तसेच जिल्हयातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.