संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- येत्या 18 डिसेंबर ला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून निवड होणाऱ्या 27 सरपंच पदासाठी 90 उमेदवार तर 27 ग्रा प च्या 93 प्रभागातील 247 सदस्य पदासाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.आज 16 डिसेंबर ला सायंकाळी साडे पाच वाजता प्रचारतोफा थंडावल्या असून उद्या 17 डिसेंबर ही दिवसा छुपा प्रचार तर रात्रीला कत्तल ची रात्र आहे.तर 18 डिसेंबर ला सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत 122 मतदान केंद्रावर मतदान होणार असून सर्वात जास्त मतदान केंद्र हे येरखेडा गावात आहेत.सरपंच पदासाठी लढत असलेल्या एकूण 27 ग्रामपंचायती पैकी 9 ग्रामपंचायत मध्ये फक्त दोन उमेदवारात सरळ थेट काट्याची लढत होत आहे.
ज्यामध्ये रणाळा ग्रा प मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग प्रवर्गातील कांग्रेसप्रणित उमेदवार देवेंद्र मोहोड विरुद्ध भाजप प्रणित उमेदवार पंकज साबळे मध्ये थेट लढत आहे.तसेच आजनी ग्रा प मध्ये नामाप्र प्रवर्गातील संजय जीवतोडे विरुद्ध बेनिराम विघे, आवंढी ग्रा प मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रीतम चंदनखेडे विरुद्ध जगदीश पौणिकर,केम ग्रा प मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून माजी उपसरपंच अतुल बाळबुधे विरुद्ध ,विठ्ठल महाले, बिना ग्रा प मध्ये नामाप्र प्रवर्गातून असलेले चुलत पुतणे आहेत.वामन मधुकर भडंग विरुद्ध नारायण मोरबाजी भडंग,दिघोरी ग्रा प सर्वसाधारण प्रवर्गातून सोनू काळे विरुद्ध सुनील डाफ,खापा ग्रा प नामाप्र स्त्री प्रवर्गातून मनीषा ठाकरे विरुद्ध आशा मदन राजूरकर,लिहिगाव ग्रा प मध्ये अनु जाती स्त्री प्रवर्गातून अस्मिता खांडेकर विरुद्ध संध्या मेश्राम तर कापसी बु ग्रा प मध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून तुळसा शेंदरे विरुद्ध शिला हटवार निवडनुक रिंगणात आहेत .तर इतर ठिकाणी तिहेरी,चौफेरी ,पंचरंगी उमेदवारी अशी लढत आहे.
मात्र 9 ग्रा प मध्ये थेट सरळ लढत असलेल्या गावातील प्रचारात दोन गट एकमेकांसमोर उभे राहिले असून प्रचारासाठी उमेद्वारासह त्यांचे कार्यकर्ते हे जोमाने प्रचाराला भिडले आहेत.सरपंच पदासह ग्रामपंचायतिची सत्ता ही अनेकांनी प्रतिष्ठित केली असल्याने निवडणुकीतील उमेदवारांच्या लढतीतील चुरस वाढली आहे.निवडणूक प्रचारासह मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च उमेदवारांना करावा लागत आहे.तर मतदार आपल्या सोयीच्या उमेदवारांना मतदान करणार किंवा नाही हे सांगता येत नसल्याने उमेदवारातर्फे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याने गावातील राजकीय वातावरण तापत आहे.