नवी दिल्ली :- भारतीय जनसंघाचे प्रणेते आणि विचारवंत दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.
कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
परिचय केंद्रात दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात दिनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यालयातील उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.